Now goolge maps will show the coivd 19 patient near by you | आता Google Map सांगणार आपल्या भागात कुठे आहेत कोरोना रुग्ण, अ‍ॅड होतेय नवे फिचर

आता Google Map सांगणार आपल्या भागात कुठे आहेत कोरोना रुग्ण, अ‍ॅड होतेय नवे फिचर

ठळक मुद्देआता गुगल मॅप आपल्या युझर्ससाठी एक विशेष फिचर अ‍ॅड करत आहे. या फिचरच्या मदतीने आपल्या भागात किती कोरोना रुग्ण आहेत, याची माहिती युझर्सना मिळवता येणार आहे.या फिचरला 'COVID लेअर', असे नाव देण्यात आले आहे.

नवी दिल्ली - सध्या संपूर्ण जगात कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या दृष्टीने आता गुगल मॅप आपल्या युझर्ससाठी एक विशेष फिचर अ‍ॅड करत आहे. या फिचरच्या मदतीने आपल्या भागात किती कोरोना रुग्ण आहेत, याची माहिती युझर्सना मिळवता येणार आहे. (Google Map)

या फिचरला 'COVID लेअर', असे नाव देण्यात आले आहे. गुगलप्ले हे नवे फिचर अँड्राईड आणि आयओएस, या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देणार आहे. यात युझर्सना केवळ कोरोना संक्रमितांची माहितीच मिळणार नाही, तर कोरोनाशी संबंधित अपडेटदेखील मिळतील. 

गुगल मॅपने अपल्या आधिकृत ट्विटर अकाउंटवरून 'COVID लेअर' फिचरसंदर्भात माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये सांगण्यात आले आहे, की मॅप्समध्ये नवे लेअर फिचर अ‍ॅड करण्यात येत आहे. हे फिचर आपल्या भागात येणाऱ्या नव्या कोविड-19 रुग्णांच्या संख्येशी संबंधित अपडेट आपल्याला देईल. एवढेच नाही, तर हे फिचर अँड्रॉईड आणि आयएसओ या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यात येईल, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे. हे अपडेट याच आठवड्यात उपल्बध केले जाऊ शकते. 

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, गुगलमॅपमध्ये लेअर बटन देण्यात येईल. हे बटन स्क्रीनवर उजव्या बाजूला असेल. या बटनवर क्लिक केल्यानंतर COVID -19 Info बटन येईल. या फिचरवर क्लिक केल्यानंतर मॅप कोविडच्या स्थितीप्रमाणे बदलेल. यात, भागातील प्रती 1,00,000 लोकांवर सात दिवसांतील नव्या रुग्णांचे प्रमाण दाखवेल आणि तसेच संबंधित भागातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे, की कमी होत आहे, हेदेखील यातून दर्शवले जाईल.


 
या शिवाय, गुगल प्ले आपल्या युझर्ससाठी कलर कोडिंगचे फिचरदेखील अ‍ॅड करणार आहे. यामुळे संबंधित भागातील नव्या रुग्णांची घणता समजू शकेल. तसेच ट्रेंडिंग मॅप डेटा गुगल मॅपला सपोर्ट करणाऱ्या सर्व देशांची आणि भागांची कंट्री लेवलदेखील दाखवेल. ही डेटा सुविधा, राज्य, प्रांत, जिल्हा स्तरावर उपलब्ध असेल.

English summary :
Now goolge maps will show the coivd 19 patient near by you

Web Title: Now goolge maps will show the coivd 19 patient near by you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.