Nothing Phone (1): 120Hz रिफ्रेश रेटसह आज लाँच होणार कंपनीचा पहिला स्मार्टफोन

By जयदीप दाभोळकर | Published: July 12, 2022 02:16 PM2022-07-12T14:16:47+5:302022-07-12T14:20:01+5:30

Nothing Phone (1) मध्ये ट्रान्सपरंट बँक देण्यात आलं असून त्याचं डिझाईनही खुप ब्राईट असेल.

Nothing phone 1 launch Expected price & specs where to watch live stream know features price technical specification | Nothing Phone (1): 120Hz रिफ्रेश रेटसह आज लाँच होणार कंपनीचा पहिला स्मार्टफोन

Nothing Phone (1): 120Hz रिफ्रेश रेटसह आज लाँच होणार कंपनीचा पहिला स्मार्टफोन

googlenewsNext

Nothing Phone (1) हा स्मार्टफोन आज जागतिक स्तरावर लाँच करण्यात येणार आहे. या फोनचं लाँच इव्हेंट रात्री साडेआठ वाजता सुरू होईल. लाँचपूर्वीच कंपनीनं या स्मार्टफोनच्या फीचर्सबद्दल काही माहिती दिली होती. यामध्ये ट्रान्सपरंट बॅक देण्यात आलं असून त्याचं डिझाईनही ब्राईट असेल. यासोबतच Nothing Phone (1) मध्ये काही अन्य महत्त्वाचे फीचर्स देण्यात आले असून त्यात 120Hz चा स्क्रिन रिफ्रेश रेटसह AMOLED डिस्प्लेही देण्यात आलाय.

Nothing Phone (1) चं लाँच इव्हेंट रात्री भारतीय वेळेनुसार साडेआठ वाजता सुरू होणार आहे. नथिंग्सच्या युट्युब चॅनलवर ते लाईव्हही पाहता येईल. या स्मार्टफोन मध्ये 6.55 FULL HD+ OLED डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय रिफ्रेश रेट 120Hz असेल. प्रोसेसर बाबत सांगायचं झालं तर यात कॉलकॉम स्नॅप ड्रॅगन 778G+ SoC असेल. तर दुसरीकडे या स्मार्टफोनमध्ये 8 जीबी पर्यंत रॅम आणि 256 जीबीचं इंटरनल स्टोरेजही मिळण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, या फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअपही मिळण्याची शक्यता आहे. फोटोग्राफीसाठी याचा पहिला सेन्सर 50MP चा असेल, तर दुसरा 16 MP चा असू शकतो. यात 16MP चा सेल्फी कॅमेराही मिळू शकतो. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये 45W फास्ट चार्जिंगही मिळण्याची शक्यता आहे. तर या स्मार्टफोनची बॅटरी 4500mAh ची असू शकते. 
या फोनची किंमत जवळपास 30,000 रुपये असण्याची शक्यता आहे. Flipkart च्या लिस्टिंगनुसारर ग्राहक HDFC बँक क्रेडिट कार्ड वापरून 2,000 रुपयांची त्वरित सूट घेऊ शकतात. यापेक्षा अधिक तपशील सध्या उपलब्ध नाहीत.

Web Title: Nothing phone 1 launch Expected price & specs where to watch live stream know features price technical specification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.