Nothing: परवडणाऱ्या किंमतीत प्रीमियम स्मार्टफोन, नथिंग फोन (३ए) लाईट भारतात लॉन्च!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 15:54 IST2025-11-27T15:49:48+5:302025-11-27T15:54:54+5:30
Nothing Phone 3a Lite Launched in India: टेक कंपनी नथिंगने आपला नवीन बजेट स्मार्टफोन नथिंग फोन (३ए) लाईट भारतात लॉन्च केला.

Nothing: परवडणाऱ्या किंमतीत प्रीमियम स्मार्टफोन, नथिंग फोन (३ए) लाईट भारतात लॉन्च!
टेक कंपनी नथिंगने भारतात आपला नवीन बजेट स्मार्टफोन, नथिंग फोन (३ए) लाईट लॉन्च केला. कंपनीने हा फोन परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून दिला आहे, त्यामुळे बजेट स्मार्टफोनच्या शोधात असलेल्या ग्राहकांना प्रीमियम स्मार्टफोन मिळवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. तसेच हा फोन फीचर्सच्या बाबतीत अनेक मध्यम श्रेणीच्या फोनना मागे टाकतो.
कंपनीने नथिंग फोन (३ए) लाईट दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. ८ जीबी + १२८ जीबी मॉडेलची किंमत ₹२०,९९९ आहे. तर, ८ जीबी + २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत ₹२२,९९९ आहे. बँक ऑफर्ससह दोन्ही मॉडेल्सवर ₹१,००० ची त्वरित सूट मिळते. हा फोन ५ डिसेंबर रोजी विक्रीसाठी उपलब्ध होईल. फ्लिपकार्ट, विजय सेल्स, क्रोमा आणि सर्व प्रमुख रिटेल स्टोअर्समधून हा फोन खरेदी करता येऊ शकतो. हा फोन पांढरा, काळा आणि निळा अशा तीन रंगात लॉन्च करण्यात आला.
नथिंग फोन (३ए) लाईटमध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि ३००० निट्स पर्यंत ब्राइटनेससह मोठा ६.७७-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. या फोनमध्ये ग्राहकांना ५० मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा मिळतो. तर, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी १६ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन ८ जीबी + १२८ जीबी आणि ८ जीबी + २५६ जीबी अशा दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आले. या फोनमध्ये ५००० एमएएच बॅटरी देण्यात आली, जी ३३ वॅट फास्ट चार्चिंगला सपोर्ट करते. महत्त्वाचे म्हणजे, हा फोन एकदा चार्ज केल्यानंतर दोन दिवस चालेल, असा दावा कंपनीने केला आहे.