१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 11:18 IST2025-07-28T11:17:17+5:302025-07-28T11:18:39+5:30
Nokia NX 5G Launched: नोकियाने त्यांचा नवा स्मार्टफोन एनएक्स 5G लॉन्च करून बाजारात मोठा धमाका केला आहे.

१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
नोकियाने त्यांचा नवा स्मार्टफोन एनएक्स 5G लॉन्च करून बाजारात मोठा धमाका केला आहे. फक्त १३ हजार ४९९ रुपयांच्या किंमतीत ग्राहकांना १०८ एमपी कॅमेरा, ६५०० एमएएच बॅटरी, १०० वॅट सुपरफास्ट चार्जिंग आणि एमोलेड डिस्प्ले मिळतोय. त्यामुळे कमी किंमतीत चांगले फीचर्स असलेल्या फोनच्या शोधात असलेल्या ग्राहकांसाठी सुवर्णसंधी आहे.
नोकिया एनएक्स 5G: डिस्प्ले
नोकिया एनएक्स 5G मध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह ६.८ इंचाचा फुल एचडी+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, जो गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शनसह येतो.
नोकिया एनएक्स 5G: कॅमेरा
या फोनमध्ये ग्राहकांना ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. फोनमध्ये १०८ मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आणि ८ मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड लेन्स आणि २ मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सरसह बाजारात दाखल झाला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ग्राहकांना ३२ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे.
नोकिया एनएक्स 5G: स्टोरेज
नोकिया एनएक्स 5G मध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी ७०५० प्रोसेसर आहे. हा फोन ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजसह लॉन्च करण्यात आला आहे. शिवाय, या फोनमध्ये वाय-फाय ६, ब्लूटूथ ५.३ सह अनेक कनेक्टिव्हिटी मिळते.
नोकिया एनएक्स 5G: बॅटरी
नोकिया एनएक्स 5G फोनची खासियत म्हणजे यात ६५००mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी एकदा चार्ज केल्यानंतर दोन दिवस चालू शकते. हा फोन ३० मिनिटांपेक्षा कमी वेळात ० ते १०० टक्क्यांपर्यंत चार्ज होतो, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.
नोकिया एनएक्स 5G: किंमत
नोकिया एनएक्स 5G हा एक बजेट-फ्रेंडली स्मार्टफोन आहे. या फोनची किंमत १३ हजार ४९९ रुपये आहे. पंरतु, या किंमतीत फोनमध्ये प्रिमियम फिचर्स देण्यात आले आहेत. त्यामुळे हा फोन बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक स्मार्टफोन निर्मात्यांचे टेन्शन वाढवू शकतो.