Nokia 3210 4G भारतात लाँच! YouTube सोबतच UPI पेमेंटची सुविधा, किंमत फक्त ३,९९९!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 04:00 PM2024-06-11T16:00:47+5:302024-06-11T16:02:15+5:30

Nokia 3210 4G हा कीपॅड फोन असून यात UPI स्कॅन करून ऑनलाइन पेमेंट करता येणार आहे

Nokia 3210 4G launches in India with UPI payment support Specifications price and other details | Nokia 3210 4G भारतात लाँच! YouTube सोबतच UPI पेमेंटची सुविधा, किंमत फक्त ३,९९९!

Nokia 3210 4G भारतात लाँच! YouTube सोबतच UPI पेमेंटची सुविधा, किंमत फक्त ३,९९९!

Nokia 3210 4G launches in India: सध्याचे युग हे स्मार्ट फोनचे युग असले तरी एक काळ नोकिया या कंपनीच्या मोबाईल्सने गाजवला होता. मधल्या काळात नोकियाच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांनी भारतीय बाजारपेठेत वेगाने प्रगती केली. त्यानंतर आता भारतात पुन्हा एकदा दमदार कामगिरी करण्यासाठी नोकिया सज्ज आहे. भारतीय बाजारपेठेत नुकताच Nokia 3210 4G हा नवीन फीचर फोन लॉन्च झाला आहे. हा एक आयकॉनिक फीचर फोन आहे. हा फोन नवीनतम अपडेटसह भारतात आला आहे. हा फोन याआधीही भारतात विकला गेला होता पण आता हा फोन अपडेटेड फीचर्ससह बाजारात येत आहे.

Nokia 3210 4G हा कीपॅड फोन आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon India आणि HMD eStore वर हा फोन विक्रीसाठी उपलब्ध आहे. या फोनची किंमत ३,९९९ रुपये आहे. यामध्ये UPI सेवा देखील देण्यात आली असून त्या मदतीने युजक क्यूआर कोड स्कॅन करून पेमेंट करू शकतात.

Nokia 3210 या मोबाइलची सगळी फीचर्स जाणून घेण्यासाठी आणि तो खरेदी करण्यासाठी इथे क्लिक करा >> https://amzn.to/4b065UF

  • तीन रंगांमध्ये उपलब्ध

Nokia 3210 4G मध्ये अनेक नवे फीचर्स देण्यात आले आहेत. याच्या मागील पॅनलवर 4G सपोर्ट आणि कॅमेरा सेन्सर देखील आहे. हा फोन Scuba Blue (निळा), Grunge Black (काळा) आणि Y2K Gold (सोनेरी) या तीन रंगात उपलब्ध आहे.

  • 'ही' ॲप्स 'प्रीलोडेड'

Nokia 3210 4G काही ॲप्स आधीपासूनच डाऊनलोड केलेली आहेत. यात Youtube, YouTube Shorts, News आणि Games इत्यादी ॲप्स आहेत. यात कंपनीने क्लासिक snake game देखील दिला आहे. हा खेळ आधीच्या काळात खूप लोकप्रिय झाला होता आणि अजूनही बरेच लोक खेळतात.

  • Nokia 3210 4G चे स्पेसिफिकेशन

Nokia 3210 4G मध्ये 2.4 इंचाचा QVGA डिस्प्ले आहे. यात UniSoC T107 प्रोसेसर आहे. या फोनचे वजन 62 ग्रॅम आहे. या फोनमध्ये 64MP रॅम आहे. हा फोन S30+ सॉफ्टवेअर सिस्टमवर कार्यरत असतो. यात 128MB स्टोरेज आहे. मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने ही मेमरी 32GB पर्यंत वाढवता येऊ शकते.

  • नोकिया 3210 4G कॅमेरा

Nokia 3210 4G मध्ये मागच्या बाजूला असलेला मूळ कॅमेरा २ मेगापिक्सेलचा आहे. त्यासोबत LED फ्लॅश लाइटही आहे. यात 1,450mAh ची In Built (न काढता येणारी) बॅटरी आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर हा फोन सुमारे ९.८ तासांचा टॉकटाइम बॅकअप देतो.

Web Title: Nokia 3210 4G launches in India with UPI payment support Specifications price and other details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.