शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
2
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
3
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
4
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
5
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
6
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
7
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
8
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
9
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
10
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
11
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
12
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
13
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
14
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
15
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
16
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
17
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
18
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
19
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
20
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!

अमेरिका, चीन नाही; तर 'हा' बनला जगातील पहिली 5G सेवा देणारा देश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2019 1:38 PM

अमेरिकेची टेलिकॉम कंपनी व्हेरिझॉन दोन शहरांमध्ये 11 एप्रिलपासून 5 जी सेवा सुरु करणार आहे. तर चीनच्या काही शहरांमध्ये अद्याप ट्रायल सुरु आहे. 

सियोल : तंत्रज्ञानाच्या बाबतीत कैक मैल पुढे असलेल्या अमेरिका, चीन, रशियाने नाही तर दक्षिण कोरियासारख्या छोट्याशा देशाने जगात पहिल्यांदा 5 जी सेवा देण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी रात्री 11 वाजता देशवासियांसाठी 5 जी लाँच करण्यात आले. 

दक्षिण कोरियाने यापूर्वी 5 एप्रिल ही देशात 5जी सेवा सुरु करण्यासाठी तारिख निश्चित केली होती. मात्र, अमेरिकी कंपन्यांना हरवण्यासाठी दोन दिवस आधीच ही सेवा सुरु करण्यात आली. 4जीच्या तुलनेत 5जी 20 पटींनी वेगवान असणार आहे. 

दक्षिण कोरियाच्या टॉपच्या टेलिकॉम कंपन्या एसके, केटी आणि एलजी यूप्लस यांनी 5जी सेवा देशभरात देण्यास सुरुवात केली. कोरियाच्या 6 महत्वाच्या सेलिब्रिटींनी त्यांच्या फेनवर ही सेवा सुरु केली. यामध्ये पॉप बँडस् ईएक्सओचे दोन सदस्यांसह ऑलिंपिक आईस स्केटींगपटू किम यू ना सहभागी होते. सर्वसामान्यांना शुक्रवारपासून ही सेवा वापरता येणार आहे.

सॅमसंगच्या नव्या गॅलेक्सी एस10 5जी मॉडेलवर पहिल्यांदाच 5जीची सेवा सुरु करण्यात आली. सॅमसंगही देखील कोरियाचीच कंपनी आहे. सॅमसंगने फेब्रुवारीमध्ये हा फोन लाँच केला होता. या फोनची किंमत 2 हजार डॉलर आहे. 

नव्या 5जी सेवेमुळे देशात ड्रायव्हरलेस कारसारख्या क्षेत्रांना गती मिळण्याची अपेक्षा कोरियाला आहे. यामुळे आर्थिक विकासालाही गती मिळेल. दक्षिण कोरिया अर्थव्यवस्थेची गती सारखी धीमी होत आहे. 2018 मध्ये आर्थिक स्तर सहा वर्षांपेक्षा खाली आला होता.

हे देश होते स्पर्धेत5जी सेवा सर्वप्रथम सुरु करण्यासाठी चीन, अमेरिका आणि द. कोरियामध्ये स्पर्धा सुरु होती. अमेरिकेची टेलिकॉम कंपनी व्हेरिझॉन दोन शहरांमध्ये 11 एप्रिलपासून 5 जी सेवा सुरु करणार आहे. तर चीनच्या काही शहरांमध्ये अद्याप ट्रायल सुरु आहे. द. कोरियाने 5जी सेवेच्या जाहिरातीसाठी करोडो रुपये खर्च केले आहेत. एसके टेलिकॉमला 2019च्या शेवटी 10 लाखांहून अधिक ग्राहक जोडले जाण्याची आशा आहे. त्यांच्याकडे सध्या 4जीसाठी 2.7 कोटी ग्राहक आहेत. तर केटी कॉर्प 4जी पेक्षा स्वस्त प्लान देणार आहे.

 

टॅग्स :South Koreaदक्षिण कोरियाAmericaअमेरिकाchinaचीनInternetइंटरनेट