Apple च्या आगामी स्मार्टवॉचमध्ये मिळणार महत्वाचं हेल्थ फीचर, ‘या’ मेंदूच्या आजाराची मिळणार माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 03:41 PM2022-06-21T15:41:26+5:302022-06-21T15:41:38+5:30

आगामी अ‍ॅप्पल वॉचमध्ये नवीन हेल्थ फीचर देण्यात येतील.  

next generation apple watch may track symptoms of brain disease  | Apple च्या आगामी स्मार्टवॉचमध्ये मिळणार महत्वाचं हेल्थ फीचर, ‘या’ मेंदूच्या आजाराची मिळणार माहिती 

Apple च्या आगामी स्मार्टवॉचमध्ये मिळणार महत्वाचं हेल्थ फीचर, ‘या’ मेंदूच्या आजाराची मिळणार माहिती 

Next

Apple नेहमीच दर्जेदार प्रोडक्ट सादर करते. असंच एक प्रोडक्ट म्हणजे अ‍ॅप्पल वॉच. कंपनीच्या या डिवाइसमुळे जीव वाचल्याचा बातम्या अधूनमधून येत असतात. आता नेक्स्ट जेनरेशन Apple स्मार्ट वॉचच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. लीक्समधून अनेक खास स्पेसिफिकेशनची माहिती मिळाली आहे. यातील हेल्थ फीचर्समुळे Parkinson’s आजाराची माहिती मिळेल.  

कंपवातची मिळणार माहिती 

PCMag च्या रिपोर्टनुसार, US फूड अँड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (FDA) नं अ‍ॅप्पल वॉचमधील अ‍ॅपला एखाद्या असा व्यक्तीच्या लक्षणांची माहिती गोळा करण्याची परवानगी दिली आहे, ज्याला पार्किंसंस अर्थात कंपवात रोगाचे निदान झालं आहे. या अ‍ॅपचं नाव StrivePD आहे, ज्याची डेव्हलपमेंट कॅलिफोर्नियामधील स्टार्ट अप Rune Labs नं केली आहे. आगामी अ‍ॅप्पल वॉचमध्ये हे हेल्थ फीचर मिळाल्यास युजर्सना मोठ्या आजाराची माहिती वेळेवर मिळेल आणि त्यावर उपाययोजना देखील वेळेवर करता येईल. 

कंपवात म्हणजे काय  

मेंदूचा जो भाग शरीराच्या हालचालींवर नियंत्रण करतो त्या भागातील चेतापेशींचा हळूहळू नाश जिच्यात होतो ती विकृती म्हणजे कंपवात. हातांना कंप सुटणे, स्नायू ताठर होणे, हालचालींमध्ये शिथिलता येणे आणि शरीराचा तोल सांभाळण्यात अडचण येणे. ही या विकाराची मुख्य लक्षणे आहेत. कंपवात झालेली व्यक्ती स्थिर बसलेली असताना त्या व्यक्ती उभी राहिल्यास तिचे धड पुढे कलालेले दिसते.  

इतर संभाव्य फीचर्स 

आगामी Apple Watch मध्ये अजून अनेक हेल्थ फीचर्स मिळतील. टेक अनॅलिस्ट जॉन प्रॉसेरनुसार आगामी WatchOS च्या फीचरमुळे Apple Watch युजर हायपरवेंटिलेटिंग करतोय का नाही हे सांगू शकेल. तसेच यात हार्ट रेट आणि ब्लड ऑक्सीजन सॅच्युरेशन लेव्हल मोजण्यात येईल. नवीन अ‍ॅप्पल वॉच आता आयफोन 14 सीरिजसह सादर केलं जाईल.  

Web Title: next generation apple watch may track symptoms of brain disease 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Apple Incअॅपल