भारतात नव्या स्मार्टफोन कंपनीची एन्ट्री! ₹२२००० रुपयांना Wobble One लाँच, कुठली आहे कंपनी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 22:02 IST2025-11-19T22:01:06+5:302025-11-19T22:02:45+5:30
भारतीय बाजारात स्मार्टफोन कंपन्यांची भरमार असताना आता नव्या कंपनीची एन्ट्री झाली आहे. या कंपनीने थेट मिडरेंज सेगमेंटमध्ये हात घातला ...

भारतात नव्या स्मार्टफोन कंपनीची एन्ट्री! ₹२२००० रुपयांना Wobble One लाँच, कुठली आहे कंपनी...
भारतीय बाजारात स्मार्टफोन कंपन्यांची भरमार असताना आता नव्या कंपनीची एन्ट्री झाली आहे. या कंपनीने थेट मिडरेंज सेगमेंटमध्ये हात घातला असून २२००० रुपयांना आपला पहिला फोन लाँच केला आहे. महत्वाचे म्हणजे ही भारतीय कंपनी आहे.
Indkal Technologies कंपनीचा Wobble ब्रँडचा भारतातील पहिला स्मार्टफोन 'Wobble One' लाँच झाला आहे. यामध्ये ६.६७-इंच 120Hz AMOLED डिस्प्ले आणि MediaTek Dimensity 7400 (4nm) प्रोसेसर देण्यात आला आहे. वोबल वनची किंमत ८जीबी + १२८जीबी मॉडेलसाठी ₹२२,००० पासून सुरू होते. हे मॉडेल मिथिक व्हाईट , एक्लिप्स ब्लॅक आणि ओडिसी ब्लू या रंगांमध्ये उपलब्ध आहे. या स्मार्टफोनची विक्री १२ डिसेंबरपासून Amazon.in आणि प्रमुख रिटेल स्टोअर्समध्ये सुरू होईल.
या फोनचा डिस्प्ले डॉल्बी व्हिजनला सपोर्ट करतो. मागच्या बाजूला OIS (ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन) सह ५०MP चा Sony LYT-600 सेन्सर (मुख्य कॅमेरा) आणि पुढच्या बाजूलाही ५०MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये ५०००mAh ची बॅटरी देण्यात आली असून ती ४७ तास कॉलिंग एवढी येऊ शकते. अॅल्युमिनियम अलॉय फ्रेम आणि ग्लास बॅक देण्यात आली आहे.