शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

प्रवास सुखकर होणार! 'पब्लिक टॉयलेट' कुठे आहे हे Google Maps सांगणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 2:31 PM

गुगल मॅप्सवर सार्वजनिक शौचालय कुठे आहे याचीही माहिती मिळणार आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत गुगलने 45 हजार कम्युनिटी आणि सार्वजनिक शौचालये गुगल मॅप्सवर अ‍ॅड केली आहेत.

ठळक मुद्देगुगल मॅप्सवर सार्वजनिक शौचालय कुठे आहे याची माहिती मिळणार आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत गुगलने 45 हजार कम्युनिटी आणि सार्वजनिक शौचालये गुगल मॅप्सवर अ‍ॅड केली आहेत.'पब्लिक टॉइलट्स नियर मी' या नावाने हे फीचर अ‍ॅपवर असणार आहे.

नवी दिल्ली - गुगल मॅप्सचा वापर हा प्रामुख्याने लोकेशन शोधण्यासाठी केला जातो. गुगुलने काहीच दिवसांपूर्वी आपल्या नेव्हिगेशन सर्व्हिसमध्ये अनेक नवीन फीचर्स अ‍ॅड केले आहेत. प्रवास उत्तम व्हावा या हेतूने अनेक गोष्टी या सातत्याने अपडेट होत आहेत. लवकरच गुगल मॅप्सवर सार्वजनिक शौचालय कुठे आहे याचीही माहिती मिळणार आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत गुगलने 45 हजार कम्युनिटी आणि सार्वजनिक शौचालये गुगल मॅप्सवर अ‍ॅड केली आहेत.

भारतातील 1700 शहरांमधील सार्वजनिक शौचालये ही गुगल मॅप्सवर मार्क केली आहेत. 'पब्लिक टॉइलट्स नियर मी' या नावाने हे फीचर अ‍ॅपवर असणार आहे. गुगलने दररोज प्रवास करणाऱ्या युजर्ससाठी आणखी एक नवं फीचर आणलं आहे. या फीचरमध्ये युजर्सना बाईक-शेअरिंग स्टेशनची माहिती दिली जाणार आहे. आयओएस आणि अ‍ॅन्ड्रॉइड अशा दोन्ही डिव्हाइसवर हे फीचर उपलब्ध असणार आहे. 

युजर्सना या फीचरच्या मदतीने बाईक उपलब्ध आहेत की नाही याबाबत माहिती मिळणार आहे. यासाठी गुगलने ट्रांजिट डेटा कंपनी आयटीओ वर्ल्डसोबत पार्टनरशीप केली आहे. गेल्या वर्षी न्यूयॉर्कमध्ये या फीचरची चाचणी घेतली होती. बाईक-शेयरिंग स्टेशन फीचर हे 24 शहरात देण्यात आले आहे. याआधी गुगलने भारतात मॅप्सवर रिडिझाइन एक्स्प्लोर टॅब, फॉर यू एक्सपिरिअन्स आणि डायनिंग ऑफर्स हे तीन नवीन फीचर लाँच केले होते. त्यामुळं यूजर्सना जवळपासचे रेस्तराँ, पेट्रोल पंप, एटीएम,ऑफर्स, शॉपिंग, हॉटेल आणि केमिस्ट संबंधित माहिती मिळते. 

प्रवासाचं नो टेन्शन! Google Maps देणार भारतीयांसाठी तीन खास फीचर्स भारतीय युजर्सचा विचार करून गुगल मॅप्सने खास तीन नवीन इंडिया सेंट्रिक फीचर्स आणले आहेत. या तीन नेव्हिगेशन फीचर्सच्या मदतीने युजर्स पब्लिक ट्रान्सपोर्ट नेविगेट करू शकता. Train, Bus आणि Metro मधून प्रवास करणाऱ्या युजर्ससाठी हे नवीन फीचर्स फायदेशीर असणार आहेत. गुगल मॅप्समधील पहिलं फीचर हे सार्वजनिक बसमधून प्रवास करणाऱ्या युजर्सना प्रवासासाठी किती वेळ लागेल याची माहिती देणार आहे. तसेत त्या मार्गावर असणाऱ्या ट्रॅफिकबाबत सांगणार आहे. तसेच प्रवासी हे दुसऱ्या मार्गाने प्रवास करण्याचा विचार करत असतील तर त्यांना त्याबाबत यामध्ये माहिती देण्यात येणार आहे. प्रवासाठी इतर पर्याय यामुळे शोधता येतात. लांबचा प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना ट्रेनचं लाईव्ह रनिंग स्टेटस दिसण्याची सुविधा देण्यात आली आहे.

 Google Maps चा ऑफलाईनही करता येतो वापर, कसा ते जाणून घ्या प्रवास करताना लोकेशन समजण्यासाठी गुगल मॅप्सचा वापर केला जातो. याच्या मदतीने रस्त्याची माहिती मिळते त्यामुळेच प्रवास करताना अडचण येत नाही. मात्र गुगल मॅपचा वापर करण्यासाठी फोनमध्ये इंटरनेट कनेक्शन असणं अत्यंत गरजेचं असतं. पण सर्वच ठिकाणी इंटरनेटची सर्व्हिस चांगली असतेच असं नाही. त्यामुळे तेथे गुगल मॅपचा वापर करताना काही समस्यांचा सामना करावा लागतो. गुगल मॅपसंबंधीत असलेल्या या समस्येपासून बचाव करण्यासाठी गुगलने आपल्या युजर्सना अ‍ॅपमध्ये एक सुविधा दिली आहे. त्या सुविधेमुळे युजर्स गुगल मॅप्सचा ऑफलाईन देखील वापर करू शकतात. कोणत्याही भागामध्ये जाऊन या अ‍ॅपच्या माध्यमातून मॅप डाऊनलोड करता येतो. 

 

टॅग्स :googleगुगलtechnologyतंत्रज्ञान