प्रवासाचं नो टेन्शन! Google Maps देणार भारतीयांसाठी तीन खास फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2019 04:12 PM2019-06-05T16:12:12+5:302019-06-05T16:21:58+5:30

लोकेशन शोधण्यासाठी गुगल मॅप्सचा वापर केला जातो. भारतीय युजर्सचा विचार करून गुगल मॅप्सने खास तीन नवीन इंडिया सेंट्रिक फीचर्स आणले आहेत.

apps google maps added three new india centric featurs for train bus delhi metro | प्रवासाचं नो टेन्शन! Google Maps देणार भारतीयांसाठी तीन खास फीचर्स

प्रवासाचं नो टेन्शन! Google Maps देणार भारतीयांसाठी तीन खास फीचर्स

Next
ठळक मुद्देभारतीय युजर्सचा विचार करून गुगल मॅप्सने खास तीन नवीन इंडिया सेंट्रिक फीचर्स आणले आहेत. तीन नेव्हिगेशन फीचर्सच्या मदतीने युजर्स पब्लिक ट्रान्सपोर्ट नेविगेट करू शकता. Train, Bus आणि Metro मधून प्रवास करणाऱ्या युजर्ससाठी हे नवीन फीचर्स फायदेशीर असणार आहेत. 

नवी दिल्ली - लोकेशन शोधण्यासाठी गुगल मॅप्सचा वापर केला जातो. भारतीय युजर्सचा विचार करून गुगल मॅप्सने खास तीन नवीन इंडिया सेंट्रिक फीचर्स आणले आहेत. या तीन नेव्हिगेशन फीचर्सच्या मदतीने युजर्स पब्लिक ट्रान्सपोर्ट नेविगेट करू शकता. Train, Bus आणि Metro मधून प्रवास करणाऱ्या युजर्ससाठी हे नवीन फीचर्स फायदेशीर असणार आहेत. 

गुगल मॅप्समधील पहिलं फीचर हे सार्वजनिक बसमधून प्रवास करणाऱ्या युजर्सना प्रवासासाठी किती वेळ लागेल याची माहिती देणार आहे. तसेत त्या मार्गावर असणाऱ्या ट्रॅफिकबाबत सांगणार आहे. तसेच प्रवासी हे दुसऱ्या मार्गाने प्रवास करण्याचा विचार करत असतील तर त्यांना त्याबाबत यामध्ये माहिती देण्यात येणार आहे. प्रवासाठी इतर पर्याय यामुळे शोधता येतात. लांबचा प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना ट्रेनचं लाईव्ह रनिंग स्टेटस दिसण्याची सुविधा देण्यात आली आहे. Google Maps च्या या तीन नेव्हिगेशन फीचर्सबाबत जाणून घेऊया. 

रियल टाईम बस ट्रॅव्हल इन्फॉर्मेशन

गुगल मॅप्सच्या या फीचरच्या मदतीने बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्या मार्गावरील ट्रॅफिकची स्थिती समजणार आहे. प्रवाशांना अनेकदा ट्रॅफीकबाबत माहिती मिळत नाही मात्र आता या फीचरच्या मदतीने रोज प्रवास करण्याऱ्या प्रवाशांचा फायदा होणार आहे. सध्या ह फीचर  बंगळुरू, चैन्नई, दिल्ली, हैदराबाद, लखनऊ, मुंबई, मैसूर, पुणे आणि सूरत या शहरात सुरू केलेले आहे. लवकरच देशातील अन्य महत्त्वाच्या शहरात ही हे फीचर रोल आऊट करण्यात येणार आहे. 

लाईव्ह ट्रेन स्टेटस 

अनेक प्रवासी ट्रेनने लांबचा प्रवास करत असतात. या फीचरच्या मदतीने या प्रवाशांचा फायदा होणार आहे. भारतीय रेल्वे नेटवर्कच्या मदतीने दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. त्यांच्यासाठी हे फीचर फायदेशीर ठरणार आहे. या फीचरमध्ये ट्रेनचं लाईव्ह रनिंग स्टेटस दिसणार आहे. 

मिक्सड मोड नेव्हिगेशन विद ऑटो रिक्षा रेकोमेंडेशन

बस आणि ट्रेनने प्रवास करण्यासोबतच ऑटो रिक्षाने देखील अनेक प्रवासी प्रवास करत असतात. या फीचरच्या मदतीने युजर्सना कोणत्या ठिकाणी रिक्षा बदलता येतील याची माहिती मिळते. तसेच तुमचं ठिकाण आणि तुम्हाला जायचं असलेलं ठिकाण यासाठी अंदाजे किती रुपये खर्च येईल याची देखील फीचरमध्ये माहिती मिळते. आता केवळ दिल्ली आणि बंगळुरू मध्ये हे फीचर सुरू करण्यात आलं आहे. मात्र लवकरच ते सर्वत्र रोलआऊट करण्यात येईल. 

Google Maps Gets New

Google Maps चा ऑफलाईनही करता येतो वापर, कसा ते जाणून घ्या 

प्रवास करताना लोकेशन समजण्यासाठी गुगल मॅप्सचा वापर केला जातो. याच्या मदतीने रस्त्याची माहिती मिळते त्यामुळेच प्रवास करताना अडचण येत नाही. मात्र गुगल मॅपचा वापर करण्यासाठी फोनमध्ये इंटरनेट कनेक्शन असणं अत्यंत गरजेचं असतं. पण सर्वच ठिकाणी इंटरनेटची सर्व्हिस चांगली असतेच असं नाही. त्यामुळे तेथे गुगल मॅपचा वापर करताना काही समस्यांचा सामना करावा लागतो. गुगल मॅपसंबंधीत असलेल्या या समस्येपासून बचाव करण्यासाठी गुगलने आपल्या युजर्सना अ‍ॅपमध्ये एक सुविधा दिली आहे. त्या सुविधेमुळे युजर्स गुगल मॅप्सचा ऑफलाईन देखील वापर करू शकतात. कोणत्याही भागामध्ये जाऊन या अ‍ॅपच्या माध्यमातून मॅप डाऊनलोड करता येतो. म्हणजेच इंटरनेटशिवाय देखील या अ‍ॅपचा वापर करता येतो. 

गुगल मॅपचे हायवेसाठी महत्वाचे फिचर; जाणून घ्या कसा कराल वापर...

एखादे ठिकाण शोधायला किंवा रस्ता दाखविण्याचे काम गुगल मॅप चांगल्या पद्धतीने करतो. वाहतूक कोंडी, एकेरी वाहतूक, शहरात फ्लायओव्हरवर जायचे की सर्व्हिस रोडने जायचे याचे मार्गदर्शन केल्याने नवख्या व्यक्तीलाही वाहन मार्गक्रमण करणे सोपे जाते. आता आणखी एक महत्वाचे फिचर गुगल मॅपमध्ये येणार आहे. ते म्हणजे Speed Limits. Google Maps च्या आयओएस आणि अँड्रॉईड प्लॅटफॉर्मवर हे फिचर लाँच होणार आहे. हे फिचर राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांबरोबरच दृतगती महामार्गांवरही उपयोगाचे ठरणार आहे. 

 

Web Title: apps google maps added three new india centric featurs for train bus delhi metro

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.