आज नवे आयफोन लाँच होणार! iPhone 17 मध्ये ५००० एमएएच बॅटरी? आयफोन १६, १५ च्या किंमती कोसळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 14:52 IST2025-09-09T14:52:34+5:302025-09-09T14:52:56+5:30

iPhone 17, Apple Event 2025: आयफोन १६ सिरीजसह १५, १४ सिरीजच्या किंमती कमी होणार आहेत. गेल्या वर्षी आयफोन १६ लाँच झाला तेव्हा कंपनीने १५ सिरीजचे फोन १० ते १५ हजारांनी स्वस्त केले होते.

New iPhone to be launched today! 5000 mAh battery in iPhone 17? Prices of iPhone 16, 15 will fall | आज नवे आयफोन लाँच होणार! iPhone 17 मध्ये ५००० एमएएच बॅटरी? आयफोन १६, १५ च्या किंमती कोसळणार

आज नवे आयफोन लाँच होणार! iPhone 17 मध्ये ५००० एमएएच बॅटरी? आयफोन १६, १५ च्या किंमती कोसळणार

भारतीय वेळेनुसार आज रात्री साडे दहा वाजता अॅपलचा आयफोन १७ सिरीज लाँचिंगचा मोठा कार्यक्रम होत आहे. यामध्ये आयफोन एअरसह आयफोन १७, प्रो आणि मॅक्स असे आयफोन व्हेरिअंट लाँच होणार आहेत. याचबरोबर एअरपॉड प्रो ३ आणि अॅपल वॉच ११ देखील लाँच होणार आहे. आयफोन १७ मध्ये ६.६ इंचाचा ओएलईडी डिस्प्ले, ए१९ चिप आणि ४८ मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा दिला जाण्याची शक्यता आहे. 

यावेळचा आयफोन जरा वेगळा असणार आहे. डिझाईन, त्यातील स्पेसिफिकेशन आदी वेगळे असण्याची शक्यता आहे. एका वृत्तानुसार आयफोन १७ प्रो मॅक्समध्ये ५००० एमएएचची बॅटरी असण्याची शक्यता आहे.  नवा आयफोन लाँच झाल्यावर कंपनी आयफोन १६ प्रो मॅक्स, आयफोन १६ प्रो, आयफोन १५ आणि आयफोन १५ प्लस बंद करण्याची शक्यता आहे. 

तसेच आयफोन १६ सिरीजसह १५, १४ सिरीजच्या किंमती कमी होणार आहेत. गेल्या वर्षी आयफोन १६ लाँच झाला तेव्हा कंपनीने १५ सिरीजचे फोन १० ते १५ हजारांनी स्वस्त केले होते. तसेच आधीच्या आयफोनपेक्षा यंदाचा आयफोन सर्वात पातळ असू शकतो. आयफोन १७ ची सुरुवातीची किंमत सुमारे ८९,९९० रुपयांपासून सुरू होऊ शकते. आयफोन १७ एअरची किंमत सुमारे ९९,९९० रुपये असू शकते. आयफोन १७ प्रो मॅक्सची किंमत १,६४,९९० रुपयांपासून सुरू होऊ शकते. 

Web Title: New iPhone to be launched today! 5000 mAh battery in iPhone 17? Prices of iPhone 16, 15 will fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Apple Incअॅपल