भारत सरकारचे डिजिटल स्ट्राइक; 348 मोबाईल अ‍ॅप्स बॅन, चीनमध्ये तयार झालेल्या अ‍ॅप्सचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 05:31 PM2022-08-03T17:31:23+5:302022-08-03T17:32:21+5:30

चंद्रशेखर म्हणाले, "हे अ‍ॅप्स 348 मोबाईल अ‍ॅप्लिकेशन यूजर्सची माहिती गोळा करत होते आणि अनधिकृतरित्या प्रोफायलिंगसाठी देशाबाहेर असलेल्या सर्व्हर्सपर्यंत पाठवत होते."

Narendra Modi government blocked 348 mobile apps developed by various countries including china | भारत सरकारचे डिजिटल स्ट्राइक; 348 मोबाईल अ‍ॅप्स बॅन, चीनमध्ये तयार झालेल्या अ‍ॅप्सचाही समावेश

भारत सरकारचे डिजिटल स्ट्राइक; 348 मोबाईल अ‍ॅप्स बॅन, चीनमध्ये तयार झालेल्या अ‍ॅप्सचाही समावेश

googlenewsNext

भारत सरकारने मोठे डिजिटल स्ट्राइक करत 300 हून अधिक मोबाईल अ‍ॅप्स ब्लॉक केले आहेत. पीटीआयच्या वृत्तानुसार, भारत सरकारने चीनसह जगातील विविध देशांमध्ये तयार करण्यात आलेले जवळपास 348 मोबाईल अ‍ॅप्स नागरिकांच्या प्रोफायलिंगसाठी युजर्सची माहिती गोळा करून परदेशात पाठवत असल्याचे म्हणत, ब्लॉक केले आहेत. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी भाजपचे रोडमल नागर यांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली.

देशाबाहेर पाठवत होते डेटा - 
चंद्रशेखर म्हणाले, "हे अ‍ॅप्स 348 मोबाईल अ‍ॅप्लिकेशन यूजर्सची माहिती गोळा करत होते आणि अनधिकृतरित्या प्रोफायलिंगसाठी देशाबाहेर असलेल्या सर्व्हर्सपर्यंत पाठवत होते."

ते म्हणाले, "एमएचएच्या विनंती वरून, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) असे 348 मोबाईल अ‍ॅप्स ब्लॉक केले आहेत. कारण अशा पद्धतीचे डेटा ट्रांसमिशन म्हणजे, भारताच्या सार्वभौमत्वाचे आणि अखंडतेचे, तसेच भारताच्या आणि राज्याच्या सुरक्षेचे उल्लंघन आहे."

चीनमध्ये तयार झाले आहेत काही अ‍ॅप्स -
यावेळी, हे सर्व अ‍ॅप्स चीनमध्ये तयार करण्यात आले आहेत? असे विचारले असता, चंद्रशेखर म्हणाले, "हे अ‍ॅप्स चीनसह विविध देशांत तयार करण्यात आले आहेत." यापूर्वीही भारत सरकारने अशा पद्धतीची कारवाई करत डिजिटल स्ट्राइक केले आहे.

Web Title: Narendra Modi government blocked 348 mobile apps developed by various countries including china

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.