शहरं
Join us  
Trending Stories
1
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
2
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायवळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
3
गोल्ड ईटीएफ ठरला नवा मल्टीबॅगर स्टॉक! इतक्या वर्षात ₹१० लाखाचे झाले तब्बल ₹१ कोटी रुपये!
4
Ratan Tata Death Anniversary: वाद... आव्हानं.., रतन टाटांच्या निधनानंतर एका वर्षात किती बदलला टाटा समूह
5
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
6
“त्रिभाषा प्रकरणी हरकती नोंदवण्याची मुदत वाढवावी, आडमार्गाने...”; मनसेचे समितीला पत्र
7
Mohammed Shami: "मी तंदुरुस्त आहे आणि..."  ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळल्यानंतर शमीने सोडले मौन! 
8
"तू मरणार आहेस का?", रक्ताच्या थारोळ्यात पाहून तैमूरने विचारलेला प्रश्न, सैफने दिलं 'हे' उत्तर
9
कोकणवासीयांच्या मदतीला शरद पवार सरसावले, ३२ ट्रेनची यादीच दिली; म्हणाले, ‘या’ ठिकाणी थांबवा!
10
रतन टाटांचा श्वान महिन्याला कमावतो इतके रुपये; एकूण संपत्ती पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही
11
सरकारकडून मदतीच्या नावाने शेतकऱ्यांची फसवणूक, आकडे फुगवून दाखवले- शरद पवार गटाचा आरोप
12
ओबीसी तरुणांच्या जीवाची सरकारला थोडीजरी काळजी असेल तर...; विजय वडेट्टीवार यांचे रोखठोक मत
13
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
14
“महायुती सरकारने राज्यात लाडका गुंड योजना सुरू करावी”; घायवळ प्रकरणावरून वडेट्टीवारांचा टोला
15
VIRAL : अरे देवा! पाठदुखी बळावली म्हणून आजीने ८ जिवंत बेडूक गिळले; पुढे जे झालं…
16
AI मुळे आयटी क्षेत्रात मोठी उलथापालथ! TCS, विप्रो, मायक्रोसॉफ्टसह जगभरात हजारो कर्मचाऱ्यांची नोकरकपात
17
अफगाणी परराष्ट्रमंत्री आजपासून 8 दिवसांच्या भारत दौऱ्यावर; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार? जाणून घ्या...
18
Tata Capital IPO Allotment: टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
19
"बस्तर बदलतंय... बंदूक, दारुगोळ्याचा धूर नाही तर वाहताहेत विकासाचे आणि विश्वासाचे वारे"
20
अशांत, अस्वस्थ, सैरभैर वाटत असेल तर संकष्टीपासून सुरू करा 'हा' छोटासा पण प्रभावी उपाय!

मुंबई वन : एका ॲपवर मेट्रो, बस, मोनोरेलसह उपनगरी रेल्वे तिकिटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 09:58 IST

ॲपद्वारे मेट्रो, बस, मोनोरेल आणि उपनगरी रेल्वे यांसारख्या ११ सार्वजनिक परिवहन सेवांचा वापर एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवरून करता येणार आहे. ते ९ ऑक्टोबरपासून सकाळी ५ वाजल्यापासून उपलब्ध झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई महानगरातील प्रवाशांचा वेगवेगळ्या वाहतूक सेवेसाठी वेगवेगळी तिकिटे काढण्याचा त्रास वाचणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ‘मुंबई वन’ हे देशातील पहिले कॉमन मोबिलिटी ॲप तयार केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी त्याचे अनावरण करण्यात आले. यातून एकाच क्यूआर कोडद्वारे विविध परिवहन सेवांमधून प्रवास करता येणार आहे. ॲपद्वारे मेट्रो, बस, मोनोरेल आणि उपनगरी रेल्वे यांसारख्या ११ सार्वजनिक परिवहन सेवांचा वापर एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवरून करता येणार आहे. ते ९ ऑक्टोबरपासून सकाळी ५ वाजल्यापासून उपलब्ध होणार आहे.

एमएमआरडीएने मुंबई महानगर प्रदेशातील प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ करण्याच्या दिशेने पाऊल उचलत एक ॲप-अमर्याद प्रवास या घोषवाक्याखाली हे ॲप विकसित केले आहे. ते हिंदी, मराठी आणि इंग्रजी या भाषांत असून त्यातून प्रवाशांना भाषेची अडचण येणार नाही. ॲप दररोज १ ते १.५ लाख व्यवहार सुरळीतपणे हाताळू शकेल. तर सर्व्हर दररोज कमाल ५० लाख व्यवहार हाताळण्यास सक्षम आहे, असे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

ॲपचे फायदेप्रवासासाठी वेगवेगळे बुकिंग आणि वेगवेगळी तिकिटे काढण्याच्या त्रासातून मुक्ततातिकिटासाठी रांगेत थांबण्याची गरज नाही कागदी तिकिटांचा वापर घटणार. पर्यावरणपूरक प्रवासाला चालना  शेअर माय लोकेशन आणि आपत्कालीन हेल्पलाइनसारखी प्रवासी सुरक्षेची फीचर्स त्यात  आहेत. त्यातून प्रवाशांची सुरक्षितता राखली जाईल. 

या सेवांचे तिकीट मिळणार एकाच ॲपवर घाटकोपर वर्सोवा मेट्रो १, अंधेरी दहिसर मेट्रो २ अ आणि मेट्रो ७, कफ परेड आरे मेट्रो ३, नवी मुंबई मेट्रो, मोनोरेल, उपनगरीय रेल्वे, बेस्ट, टीएमटी, एमबीएमटी, केडीएमटी, एनएमएमटी या वाहतूक सेवांचे तिकीट या ॲपद्वारे काढता येणार आहे. 

मुंबई वन ॲपमुळे मार्गांची उपलब्धता, सेवा संदर्भातील रिअल-टाइम माहिती प्रवाशांना मिळेल. सर्व व्यवहार डिजिटल वॉलेट्स, प्रीपेड बॅलन्सद्वारे कॅशलेस होतील. ॲपसाठी   अतिरिक्त शुल्क नसेल.

पर्यटनाला  चालनादेशी व परदेशी पर्यटकांना शहरातील महत्त्वाची आकर्षणे, निवडक खाद्यपदार्थ आणि सांस्कृतिक केंद्रांची माहिती ॲपवर उपलब्ध होईल. तसेच  मुंबईतील विविध प्रेक्षणीय स्थळांची विस्तृत माहिती समाविष्ट आहे. मॉल, पेट्रोल पंप अशा उपयुक्त ठिकाणांचा नकाशावर आधारित तपशील देण्यात आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai One App: Tickets for all transport on one platform.

Web Summary : Mumbai's 'Mumbai One' app streamlines travel with a single QR code for metro, bus, rail and more. Launched by PM Modi, the app offers cashless transactions and real-time information, promoting seamless and eco-friendly journeys for commuters and tourists.
टॅग्स :MumbaiमुंबईMetroमेट्रोBESTबेस्टNarendra Modiनरेंद्र मोदी