जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 15:41 IST2025-06-16T15:41:34+5:302025-06-16T15:41:54+5:30

बहुतांश लोकांना इंटरनेट मिळत नाहीय. डाऊन डिटेक्टरकडे दुपारी दोनच्या सुमारास जवळपास ११ हजारच्या वर तक्रारी आल्या आहेत.

Mukesh Ambani's Reliance Jio's network is down! Internet gone, calls dropped...; Fiber customers also upset... | जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 

जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 

अवघ्या काही वर्षांत देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी बनलेल्या रिलायन्स जिओच्या ग्राहकांना आज त्रास सहन करावा लागला आहे. जिओचे नेटवर्क डाऊन झाले असून इंटरनेट, कॉल ड्रॉपसह फायबरच्या ग्राहकांनाही याचा फटका सहन करावा लागत आहे. 

बहुतांश लोकांना इंटरनेट मिळत नाहीय. डाऊन डिटेक्टरकडे दुपारी दोनच्या सुमारास जवळपास ११ हजारच्या वर तक्रारी आल्या आहेत. फायबर आणि मोबाईल इंटरनेट कनेक्टीव्हिटीमुळे बहुतांश युजर त्रस्त झाले आहेत. यापैकी ५६ टक्के ग्राहकांनी मोबाईल इंटरनेटसंबंधी समस्या असल्याचे कळविले आहे. २२ टक्के लोकांना मोबाईल कनेक्टीव्हिटीचा त्रास झाला आहे. अनेकांचे कॉल ड्रॉप होत आहेत. तर २२ टक्के युजर्सना जिओ फायबरच्या सेवेत बाधा आली आहे. याबाबतचे वृत्त एनबीटीने दिले आहे. 

सोशल मीडियावरही लोक जिओ नेटवर्क डाऊन असल्याच्या तक्रारी करत आहेत. केरळमध्ये जिओचे नेटवर्क डाऊन असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. देशभरातही नेटवर्क डाऊन असल्याचे लोक सांगत आहेत. जिओचे नेटवर्क डाऊन झाल्याने युजर सोशल मीडियावर मीम्स शेअर करत आहेत. दिल्लीतही लोकांना ही समस्या आली आहे. जवळपास ४५ मिनिटे नेटवर्क डाऊन असल्याचे सांगितले जात आहे. जिओकडून अद्याप यावर काही प्रतिक्रिया आलेली नाहीय. 

यापूर्वीही अनेकदा जिओचे नेटवर्क गंडलेले आहे. सध्या बहुतांश मोबाईलवर जिओची सिम आहेत. यामुळे जास्त लोकांना त्रास होत आहे. व्होडाफोन आयडिया बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. 

Web Title: Mukesh Ambani's Reliance Jio's network is down! Internet gone, calls dropped...; Fiber customers also upset...