12GB रॅम आणि 108MP कॅमेरा असलेली Motorola Edge 20 सीरिज येणार भारतात; कंपनीने दिले संकेत  

By सिद्धेश जाधव | Published: August 9, 2021 01:00 PM2021-08-09T13:00:23+5:302021-08-09T13:00:57+5:30

Motorola Edge 20 Series India: मोटोरोला इंडियाने आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून Moto Edge 20 सीरीजच्या लाँचची माहिती दिली आहे.

Motorola Edge 20 Series India Launch Tease  | 12GB रॅम आणि 108MP कॅमेरा असलेली Motorola Edge 20 सीरिज येणार भारतात; कंपनीने दिले संकेत  

12GB रॅम आणि 108MP कॅमेरा असलेली Motorola Edge 20 सीरिज येणार भारतात; कंपनीने दिले संकेत  

Next

Motorola ने जुलैमध्ये जागतिक बाजारात आपली ‘एज 20‘ सीरीज सादर केली होती. या सीरीजमध्ये Motorola Edge 20, Motorola Edge 20 Pro आणि Motorola Edge 20 Lite असे तीन स्मार्टफोन कंपनीने लाँच केले होते. या तिन्ही स्मार्टफोन्सची खासियत म्हणजे यातील 108 मेगापिक्सलचा कॅमेरा. आता ही मोटरला एज 20 सीरिज भारतीयांच्या भेटीला येत आहे.  (Motorola India teases Edge 20 Series India launch) 

मोटोरोला इंडियाने आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून Moto Edge 20 सीरीजच्या लाँचची माहिती दिली आहे. कंपनीने एज 20 सीरीज सोशल मीडियावर टीज केली आहे, त्यामुळे लवकरच ही सीरिज भारतात लाँच केली जाईल हे स्पष्ट झाले आहे. आता ही सीरिज कधी भारतात दाखल होईल याची माहिती कंपनीने दिली नाही. तसेच या सिरीजमध्ये कोणकोणते स्मार्टफोन कंपनी सादर करणार आहे, हे देखील समजले नाही.  

Motorola Edge 20 आणि Motorola Edge 20 Pro चे स्पेसिफिकेशन्स   

मोटोरोलाने या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 6.67 इंचाचा फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 2400 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन आणि 144हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. मोटोरोला एज 20 स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778जी चिपसेट आहे तर मोटोरोला एज 20 प्रो मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 870 चिपसेट मिळतो. हे दोन्ही फोन अँड्रॉइड 12 ऑपरेटिंग सिस्टमसह सादर करण्यात आले आहेत.   

फोटोग्राफीसाठी या दोन्ही मोटोरोला फोनमध्ये 108 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा देण्यात आला आहे. सोबत 16 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल सेन्सर आणि 8 मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स देण्यात आली आहेत. सेल्फीसाठी दोन्ही फोन्समध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. मोटोरोला एज 20 मध्ये 4,000एमएएचची बॅटरी 33W TurboPower फास्ट चार्जींगसह देण्यात आली आहे. तर मोटोरोला एज 20 प्रो मधील 4,500एमएएच बॅटरी 30W TurboPower फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.   

Motorola Edge 20 आणि Edge 20 Pro ची किंमत   

मोटोरोलो एज 20 स्मार्टफोन 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह 499.99 युरो म्हणजे भारतीय करंसीनुसार 44,000 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. तर 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेला मोटोरोला एज 20 प्रो €699.99 म्हणजे सुमारे 60,000 रुपयांमध्ये उपलब्ध होईल.   

Web Title: Motorola Edge 20 Series India Launch Tease 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.