शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
7
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
8
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
9
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
10
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
11
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
12
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
13
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
14
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
15
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
16
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
17
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
18
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
19
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
20
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा

फेस अनलॉक फिचरयुक्त भारत ५ प्रो

By शेखर पाटील | Updated: March 15, 2018 12:53 IST

विशेष करून मल्टी-टास्कींगसाठी ही बॅटरी उपयुक्त असल्याचा या कंपनीचा दावा आहे.

मुंबई: मायक्रोमॅक्स कंपनीने आपला भारत ५ प्रो हा स्मार्टफोन बाजारपेठेत उतारला असून यात ऑटो फेस अनलॉक हे फिचर देण्यात आले आहे. मायक्रोमॅक्सने आधीच भारत ५ हा स्मार्टफोन सादर केला आहे. याचीच पुढील आवृत्ती भारत ५ प्रो असल्याचे मानले जात आहे. या अनुषंगाने यात काही अद्ययावत फिचर्स दिले आहेत. बहुतांश उच्च श्रेणीतील स्मार्टफोन्समध्ये ऑटो फेस अनलॉक हे फिचर दिलेले असते. आता हेच फिचर किफायतशीर दरातल्या मॉडेल्समध्येही देण्यात येत आहे. या अनुषंगाने मायक्रोमॅक्स कंपनीने सादर केलेल्या भारत ५ प्रो या ७,९९९ रूपये मूल्य असणार्‍या स्मार्टफोनमध्येही हे फिचर देण्यात आले आहे. हे मॉडेल ग्राहकांना पुढील आठवड्यापासून देशभरातील शॉपीजमधून खरेदी करता येणार आहे. यात ओटीजी सपोर्टदेखील देण्यात आला आहे. तर यात तब्बल ५,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून ती दोन दिवसांपर्यंत बॅकअप देत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. विशेष करून मल्टी-टास्कींगसाठी ही बॅटरी उपयुक्त असल्याचा या कंपनीचा दावा आहे. 

मायक्रोमॅक्सच्या भारत ५ प्रो या मॉडेलमध्ये ५.२ इंच आकारमानाचा आणि एचडी म्हणजेच १२८० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले दिलेला आहे. यात मीडियाटेकचा क्वॉड-कोअर एमटी ६७३७ प्रोसेसर असेल. याची रॅम ३ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविता येणार आहे. एलईडी आणि ऑटो-फोकस या फिचर्ससह यातील मुख्य आणि फ्रंट कॅमेरा १३ व ५ मेगापिक्सल्स क्षमतेचा आहे. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. याच्या जोडीला यात अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत.

टॅग्स :Mobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान