मेटाचा मेगा ब्लॉक : चक्क तासाचा ब्रेक... युजर्सला धाकधूक!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 11:14 PM2024-03-05T23:14:16+5:302024-03-05T23:14:56+5:30

Facebook Instagram Down: अकाउंट मधून अचानक लॉग आऊट झाल्यामुळे युजर्स बुचकुळ्यात पडले.

Meta's Mega Block: An hour's break... Users are scared! | मेटाचा मेगा ब्लॉक : चक्क तासाचा ब्रेक... युजर्सला धाकधूक!

मेटाचा मेगा ब्लॉक : चक्क तासाचा ब्रेक... युजर्सला धाकधूक!

Facebook Instagram Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आणि इंस्टाग्राम मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास ठप्प पडले. काहींना युट्युब आणि एक्सपर्यंत पोहोचणेही अशक्य झाले. अकाउंट मधून अचानक लॉग आऊट झाल्यामुळे युजर्स बुचकुळ्यात पडले. तासाभरात सेवा पूर्ववत करून देण्यासाठी एकीकडे प्रयत्न सुरू झाले. तर दुसरीकडे ट्विटर आणि व्हाट्सअप या सोशल मीडियावर या प्रसंगाचे मीम्स प्रचंड वायरल झाले.

सोशल मीडियावर सर्वाधिक युजर्स असलेले फेसबुक इंस्टाग्राम आणि एक्स या अकाउंट वापरणाऱ्यांचे मंगळवारी रात्री नऊ वाजता ऑटोमॅटिक लॉग आऊट झाले. अचानक फेसबुक मधून बाहेर पडल्यानंतर पुन्हा लॉगिन करण्यास अडथळे येत असल्याने एकमेकांकडे चौकशीही करण्यात आली. प्रत्येकालाच अडचण येत असल्याने सर्वरचा काही प्रॉब्लेम असेल असा विचार करून युजर्सनी या क्षणाचा मीम्सच्या माध्यमातून आनंद घेतला. तर रशियन हॅकर्स, ब्रिज ऑफ ट्रस्ट, का डिजिटल वॉर याबाबत सायबर तज्ज्ञ आडाखे बांधत आहेत. 

१. थेट लॉग आऊट होणं धोक्याची घंटा
सोशल मीडिया वापरणाऱ्या अनेकांना फेसबुक आणि इंस्टाग्राम अधिक सुरक्षित वाटते. एन्ड टू एन्ड इनस्क्रिप्शन असल्यामुळे येथे वापरकर्त्याची प्रायव्हसी उत्तम पद्धतीने राखली जात असल्याने या सोशल मीडियावर कोट्यावधींचा भरोसा आहे. मंगळवारी रात्री अचानक फेसबुक मधून सर्वजण लॉग आऊट झाल्यानंतर या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकाच वेळी जगभरातील अकाउंट ऑटोमॅटिक लॉग आऊट होणं याचाच अर्थ सिक्युरिटी कॉम्प्रमाईज झाली असं सायबर तज्ज्ञ सांगतात.

२. डिजिटल वॉरची नांदी की रशियन हॅकर्सचा प्रताप!
फेसबुक आणि इंस्टाग्राम हे मेटाचे दोन्ही प्लॅटफॉर्मचे सर्वर अत्यंत सुरक्षित मानले जातात. मेटाकडे स्वतःचे सर्वर फार्म आहेत. हजारो हेक्टर क्षेत्रात पसरलेल्या या सर्वर फार्मची कडेकोट सुरक्षा व्यवस्था कोणी छेदली का? यावरही आंतरराष्ट्रीय पातळीवर तपासणी सुरू आहे. 

जागतिक स्तरावर अस्तित्व असणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची सुरक्षितता भेदणे सोपे नाही. शहरापेक्षा अधिक मोठ्या भागात स्वतःच्या मालकीचे फार्म सर्वर असलेल्या मेटाच्या तांत्रिक सुरक्षिततेवर युजर्स कडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. याबाबत जगभरातील सायबर तज्ञ लवकरच आपले निष्कर्ष मांडतील.
- जय गायकवाड, सायबर तज्ज्ञ

Web Title: Meta's Mega Block: An hour's break... Users are scared!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.