अब्राहम लिंकन यांच्यासारखं बोलणारं AI चॅटबॉट, Meta लवकरच लाँच करू शकतं - रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 10:43 PM2023-08-01T22:43:22+5:302023-08-01T22:43:50+5:30

मेटाचा हा चॅटबॉट्स सप्टेंबरच्या सुरुवातीला लाँच केला जाऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे. 

meta to soon launch ai chatbot that will speak like abraham lincoln report | अब्राहम लिंकन यांच्यासारखं बोलणारं AI चॅटबॉट, Meta लवकरच लाँच करू शकतं - रिपोर्ट

अब्राहम लिंकन यांच्यासारखं बोलणारं AI चॅटबॉट, Meta लवकरच लाँच करू शकतं - रिपोर्ट

googlenewsNext

नवी दिल्ली : मेटा (Meta) लवकरच आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) सर्वोत्तम नवीन चॅटबॉटवर काम करत आहे. रिपोर्ट्सनुसार, फेसबुकची पेरेंट कंपनी मेटा विविध प्रकारचे चॅटबॉट्स तयार करत आहे, ज्यामध्ये विविध व्यक्तिमत्त्वे दिसून येतात. मेटाचा हा चॅटबॉट्स सप्टेंबरच्या सुरुवातीला लाँच केला जाऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे. 

मेटाच्या या प्रोजेक्टशी संबंधित लोकांचे म्हणणे आहे की, कंपनी अशा चॅटबॉट्सच्या प्रोटोटाइपवर काम करत आहे , जे आपल्या युजर्ससोबत माणसांशी संवाद साधू शकतात. या चॅटबॉटच्या मदतीने, मेटाला आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसह युजर्सची प्रतिबद्धता वाढवायची आहे.

या चॅटबॉट्सपैकी एक अमेरिकेचे १६ वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांच्याप्रमाणे बोलू शकतो, असा दावाही रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. यासोबतच आणखी एक चॅटबॉट प्रवासाच्या पर्यायांबद्दल बोलतो. रिपोर्टनुसार, हा चॅटबॉट युजर्संना सर्च फंक्शन सह आपल्या रिकमेन्डेशन सुद्धा देईल.

Llama 2 लँग्वेज मॉडेल 
मेटाने काही दिवसांपूर्वी  Llama 2 हे लँग्वेज मॉडेल सादर केले होते. याच्या मदतीने इतर कंपन्या स्वतःसाठी चॅटबॉट्स तयार करू शकतील.  Llama 2 चे दोन व्हर्जन आहेत. यापैकी एक  Llama 2 आणि दुसरा Llama 2-Chat आहे. Llama 2-Chat ला टू-वे कन्व्हर्सेशनसाठी डिझाइन केले आहे.

Google आणि Alexa चे प्लॅनिंग
गुगलने ChatGPT बनवणारी कंपनी OpenAI प्रमाणे लँग्वेज मॉडेल PaLM 2 देखील विकसित केले आहे. यासोबतच अॅमेझॉन आपला व्हर्च्युअल असिस्टंटAlexa ला अधिक संवादी बनवण्यासाठी AI सपोर्ट आणण्याचा विचार करत आहे. यासोबतच गुगल सुद्धा आपल्या लँग्वेज मॉडेल (LLM) सह असिस्टेंटला 'सुपरचार्ज' करणे आणि त्याला आणखी चांगले बनवण्यावर काम करत आहे.

Web Title: meta to soon launch ai chatbot that will speak like abraham lincoln report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.