सिम कार्डबाबत अनेक नियम बदलले आहेत. सिम कार्ड वैध असणे खूप महत्वाचे आहे, तुमचे सिम कार्ड जर सुरू ठेवायचे असेल तर तुम्हाला काही रिचार्ज करावे लागतात. आता सायबर फसवणूक रोखण्यासाठी सिम कार्डबाबत नवीन नियम बदलण्यात आले आहेत.
BSNL ने खाजगी कंपन्यांची उडवली झोप, 'या' तीन प्लॅनमुळे कोट्यवधी युजर्सची मजा!
आता नवीन सिम कार्ड सुरू ठेवण्यासाठी आधारद्वारे बायोमेट्रिक पडताळणी करणे अनिवार्य झाले आहे. सरकारने सिम कार्ड विक्रीसाठी किरकोळ विक्रेत्यांसाठी नवीन नियम देखील जारी केले आहेत. आता किरकोळ विक्रेत्यांना ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच सिम कार्ड विकावे लागतील. ग्राहकाच्या नावावर किती सिम कार्ड कनेक्शन आहेत हे तपासणे आवश्यक आहे. तसेच, जर ग्राहकाने वेगवेगळ्या नावांनी सिम कार्ड घेतले असतील तर त्यांचीही आता चौकशी केली जाईल. यासोबतच, ग्राहकाचा फोटोही १० वेगवेगळ्या कोनातून काढावा लागेल.
दूरसंचार विभागाच्या नियमांनुसार, एखादी व्यक्ती त्यांच्या आधार कार्डचा वापर करून फक्त ९ सिम खरेदी करू शकतात. ९ पेक्षा जास्त सिम कार्ड बाळगल्यास पहिल्यांदाच गुन्हा करणाऱ्याला ५०,००० रुपये आणि पुन्हा गुन्हा करणाऱ्याला २ लाख रुपये दंड आकारला जाईल.
बेकायदेशीर मार्गाने सिम कार्ड मिळवल्यास ५० लाख रुपयांपर्यंत दंड आणि तीन वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद आहे. तुमच्या आधार कार्डला किती सिम लिंक आहेत हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. जर तुम्ही सिम वापरत नसाल तर तुम्ही ते डिस्कनेक्ट करू शकता.
आधार लिंकची माहिती ठेवावी लागेल
तुमच्या आधारशी किती सिम कार्ड लिंक आहेत याची माहिती ठेवा आणि तुम्ही वापरत नसलेले नंबर ताबडतोब अनलिंक करा. तुम्ही हे काम काही सेकंदात करू शकता.
आधार नंबरवरुन या पद्धतीने तपासा
यासाठी आधी तुम्हाला Sancharsathi.gov.in वर जावे लागेल.
आता मोबाईल कनेक्शन पर्यायावर क्लिक करा.
आता तुमचा संपर्क क्रमांक यामध्ये भरा .
यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. यानंतर, आधार क्रमांकाशी संबंधित सर्व क्रमांक वेबसाइटवर दिसतील.
यानंतर तुम्ही वापरात नसलेल्या किंवा तुम्हाला गरज नसलेल्या नंबरची तक्रार करू शकता आणि ब्लॉक करू शकता.