LPG Booking Scam: गॅस सिलिंडर बुकिंगच्या नावाखाली ग्राहकांची लूट; एका चुकीमुळे बँक अकाऊंट होईल रिकामं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 15:40 IST2026-03-19T15:38:35+5:302026-03-19T15:40:07+5:30

LPG Booking Scam Alert: सिलिंडरसाठी लांबच लांब रांगा लावल्या. याचाच फायदा आता स्कॅमर्सनी घेण्यास सुरुवात केली आहे.

lpg cylinder booking fraud delhi police alert apk file scam how to stay safe | LPG Booking Scam: गॅस सिलिंडर बुकिंगच्या नावाखाली ग्राहकांची लूट; एका चुकीमुळे बँक अकाऊंट होईल रिकामं

AI फोटो

LPG गॅस सिलिंडरची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. अनेकांनी सिलिंडरसाठी लांबच लांब रांगा लावल्या. याचाच फायदा आता स्कॅमर्सनी घेण्यास सुरुवात केली आहे. दिल्ली पोलिसांनी डिजिटल फसवणुकीचं एक नवीन प्रकरण उघडकीस आणलं आहे, ज्यामध्ये सिलिंडर बुकिंगच्या नावाखाली लोकांच्या फोनवर धोकादायक APK फाईल्स आणि फिशिंग लिंक्स पाठवल्या जात आहेत. स्कॅमर्स लोकांची KYC पेंडिंग किंवा कनेक्शन कापलं जाण्याची भीती दाखवून फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत.

सिलिंडर बुकिंगच्या नावाखाली अनोळखी नंबरवरून येणारे मेसेज किंवा APK फाईल्स विसरूनही डाऊनलोड करू नका. या फाईल्सच्या माध्यमातून स्कॅमर्स लांबूनच तुमच्या फोनवर पूर्ण कंट्रोल मिळवू शकतात आणि काही मिनिटांत तुमचं बँक खातं रिकामं करू शकतात.

ऑनलाईन स्कॅमर्सनी लोकांना फसवण्यासाठी Indane आणि HP सारख्या नामांकित कंपन्यांच्या नावाशी मिळत्याजुळत्या बनावट वेबसाईट तयार केल्या आहेत. हे स्कॅमर्स SMS आणि WhatsApp द्वारे मेसेज पाठवून तुमचे KYC किंवा आधार लिंक पेंडिंग असल्याचं सांगत आहेत.

दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रांचने दिलेल्या माहितीनुसार, या मेसेजमधील लिंकवर क्लिक केल्यानंतर लोकांच्या फोनमध्ये APK फाईल डाऊनलोड होते. यामुळे फोनचा पूर्ण कंट्रोल हॅकर्सना मिळतो. पोलिसांनी आतापर्यंत अशा अनेक बनावट साईट्स ब्लॉक केल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे.

ऑनलाईन फसवणुकीपासून 'असं' वाचा

गॅस सिलिंडर बुक करताना किंवा इतर कोणत्याही कामासाठी कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका. अनोळखी नंबरवरून आलेले मेसेज दुर्लक्षित करा.

तुम्हाला KYC किंवा आधार लिंकबाबत शंका असेल, तर थेट गॅस एजन्सीच्या ऑफिसमध्ये जा किंवा अधिकृत कस्टमर केअर नंबरवर संपर्क साधा. WhatsApp मेसेजवर विश्वास ठेवू नका.

सिलिंडर बुकिंगसाठी गॅस कंपनीच्या अधिकृत नंबरवर कॉल किंवा मिस्ड कॉल द्या. तसेच कंपनीचे अधिकृत ॲप किंवा PhonePe, Google Pay सारख्या विश्वासार्ह ॲप्सचाच वापर करा.

स्मार्टफोनच्या सेटिंगमध्ये जाऊन 'Unknown Sources' हा पर्याय बंद ठेवा. यामुळे गुगल प्ले स्टोअरशिवाय इतर कोणत्याही ठिकाणाहून अनधिकृत APK फाईल्स डाऊनलोड होणार नाहीत.

तुमचे बँकिंग डिटेल्स कोणाशीही शेअर करू नका. फसवणूक झाल्यास त्वरित नॅशनल सायबर क्राईम हेल्पलाइन नंबर १९३० वर कॉल करा किंवा www.cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा.

Web Title : गैस सिलेंडर बुकिंग घोटाला: धोखेबाज लिंक से रहें सावधान, खाली हो जाएगा खाता!

Web Summary : ठग गैस सिलेंडर बुकिंग के फर्जी ऑफर्स और लिंक का इस्तेमाल कर बैंकिंग जानकारी चुरा रहे हैं। दिल्ली पुलिस ने संदिग्ध लिंक पर क्लिक करने या अज्ञात एपीके फाइलें डाउनलोड करने के खिलाफ चेतावनी दी है। आधिकारिक ऐप/नंबर का उपयोग करें और धोखाधड़ी की तुरंत रिपोर्ट करें।

Web Title : Gas cylinder booking scam: Beware of fraudulent links, empty bank accounts!

Web Summary : Scammers are using fake gas cylinder booking offers and links to steal banking details. Delhi Police warns against clicking on suspicious links or downloading unknown APK files. Use official apps/numbers and report fraud immediately.