शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
5
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
6
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
7
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
8
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
9
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
10
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
11
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
12
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
13
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
14
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
15
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
16
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
17
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

Realme चे दोन स्वस्त स्मार्टफोन लवकरच होऊ शकतात लाँच; जाणून घ्या Realme 8i आणि Realme 8s ची माहिती  

By सिद्धेश जाधव | Published: July 28, 2021 11:43 AM

Realme 8i and Realme 8s India Launch: Realme 8i आणि Realme 8s स्मार्टफोन लवकरच भारतात लवकरच दाखल होऊ शकतात अशी माहिती टिप्सटरने दिली आहे.

Realme आपल्या Realme 8 सीरिज अंतर्गत दोन नवीन मोबाईल फोन Realme 8i आणि Realme 8s भारतात लाँच करू शकते. या सीरिजमध्ये कंपनीने Realme 8 4G, Realme 8 5G आणि Realme 8 Pro असे तीन स्मार्टफोन याआधी लाँच केले आहेत. आता आगामी काही आठवड्यात या सीरिजमध्ये अजून दोन स्मार्टफोन्स सादर केले जाऊ शकतात अशी माहिती टिपस्टर मुकुल शर्माने ट्विटरवरून दिली आहे.  

Realme 8i चे स्पेसिफिकेशन्स 

काही दिवसांपूर्वी Realme 8i स्मार्टफोन चीनी सर्टिफिकेशन्स साइट टेनावर दिसला होता. तिथे हा फोन RMX2205 मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला होता. या लिस्टिंगमधून या फोनच्या स्पेसिफिकेशन्स आणि फोटोचा देखील खुलासा झाला आहे. लिस्टिंगनुसार, Realme 8i पंच-होल डिस्प्लेसह लाँच केला जाईल, हा होल वरच्या बाजूला डावीकडे असेल. हा फोन बेजल लेस डिस्प्लेसह सादर केला जाऊ शकतो, या डिस्प्लेच्या तिन्ही कडा बेजल लेस असू शकतात आणि तळाला बारीक चिन पार्ट असेल. फोनच्या मागे आयताकृती रियर कॅमेरा सेटअप तीन कॅमेरा सेन्सरसह देण्यात येईल. बॅक पॅनलवर डावीकडे ‘Dare to Leap’ ब्रँडिंग असेल. या रियलमीच्या साईड पॅनलवर पावर बटण आणि वाल्यूम रॉकर दिसत आहे.  

Realme 8i टेना वर 6.43 इंचाच्या मोठ्या डिस्प्लेसह लिस्ट करण्यात आला होता. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर असल्यामुळे हा एक अ‍ॅमोलेड पॅनल असू शकतो. लिस्टिंगनुसार या फोनचा आकार 158.5 x 73.3 x 8.4एमएम असेल. हा फोन अँड्रॉइड 11 ओएस वर चालू शकतो. या ड्युअल सिम फोनमध्ये 4,400एमएएच बॅटरी दिली जाऊ शकते. रियलमीने Realme 8i आणि Realme 8s बद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.  

टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड