iPhone 17 सारखा लुक, 9000mAh बॅटरी अन् 16GB रॅम; Redmi चा दमदार फोन लॉन्च
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 13:08 IST2026-01-30T13:08:02+5:302026-01-30T13:08:40+5:30
जाणून घ्या या दमदार स्मार्टफोनचे फीचर्स...

iPhone 17 सारखा लुक, 9000mAh बॅटरी अन् 16GB रॅम; Redmi चा दमदार फोन लॉन्च
स्मार्टफोन निर्माता Redmi ने आपली नवी Turbo 5 सीरीज लॉन्च केली आहे. या अंतर्गत Redmi Turbo 5 आणि Redmi Turbo 5 Max हे दोन दमदार स्मार्टफोन सादर करण्यात आले आहेत. मोठी बॅटरी, दमदार प्रोसेसर आणि iPhone 17 सारखा प्रीमियम लूक...ही या सीरीजची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. विशेष म्हणजे, या फोनमध्ये iPhone 17 Pro सारख्या भगव्या (Orange) रंगाचा पर्याय देखील देण्यात आला आहे.
Redmi Turbo 5 सीरीजची किंमत
- Redmi Turbo 5 (स्टँडर्ड मॉडेल)
या फोनची सुरुवातीची किंमत CNY 2299 (सुमारे 30,000 रुपये) आहे. यामध्ये Auspicious Cloud White, Shadow Black, Shallow Sea Blue...असे रंग पर्याय मिळतील.
12GB RAM + 256GB : CNY 2299 (₹30,000)
12GB RAM + 512GB : CNY 2599 (₹34,000)
16GB RAM + 256GB : CNY 2599 (₹34,000)
16GB RAM + 512GB : CNY 2899 (₹38,000)
- Redmi Turbo 5 Max
या फोनची सुरुवातीची किंमत CNY 2499 (सुमारे 33,000 रुपये) ठेवण्यात आली आहे. यात Auspicious Cloud White, Sea Breeze Blue, Shadow Black, Sun Orange...असे रंग पर्याय मिळतील.
12GB RAM + 256GB : CNY 2499 (₹33,000)
12GB RAM + 512GB : CNY 2999 (₹40,000)
16GB RAM + 256GB : CNY 2799 (₹37,000)
16GB RAM + 512GB : CNY 3299 (₹44,000)
- डिझाइन आणि डिस्प्ले
Redmi Turbo 5 आणि Turbo 5 Max हे दोन्ही फोन प्रीमियम डिझाइनसह येतात. कॅमेरा मॉड्यूल iPhone 17 सारखे दिसते.
Redmi Turbo 5: 6.59 इंच AMOLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट अन् 3500 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस.
Redmi Turbo 5 Max: 6.83 इंच AMOLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट अन् 3500 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस.
- प्रोसेसर, सॉफ्टवेअर आणि कनेक्टिव्हिटी
Redmi Turbo 5 मध्ये MediaTek Dimensity 8500 Ultra प्रोसेसर
Turbo 5 Max मध्ये Dimensity 9500 Ultra प्रोसेसर
16GB पर्यंत RAM आणि 512GB पर्यंत स्टोरेज
Android 16 आधारित HyperOS 3
5G, Dual Band Wi-Fi, Bluetooth, NFC सपोर्ट
हे दोन्ही फोन IP66, IP68, IP69 आणि IP69K रेटिंगसह येतात, त्यामुळे पाणी आणि धुळीपासून अधिक सुरक्षित राहतात.
- कॅमेरा फीचर्स
या सीरीजमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
50MP प्रायमरी कॅमेरा (OIS सपोर्टसह)
8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा
20MP फ्रंट कॅमेरा (सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी)
बॅटरी आणि चार्जिंग
Redmi Turbo 5: 7560mAh बॅटरी
Redmi Turbo 5 Max: 9000mAh बॅटरी
100W फास्ट वायर्ड चार्जिंग
27W रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट
Redmi Turbo 5 vs Turbo 5 Max (फीचर तुलना)
| फीचर | Redmi Turbo 5 | Redmi Turbo 5 Max |
|---|---|---|
| डिस्प्ले | 6.59" AMOLED, 120Hz | 6.83" AMOLED, 120Hz |
| प्रोसेसर | Dimensity 8500 Ultra | Dimensity 9500 Ultra |
| RAM/स्टोरेज | 16GB / 512GB | 16GB / 512GB |
| बॅटरी | 7560mAh, 100W | 9000mAh, 100W |
| कॅमेरा | 50MP+8MP, 20MP | 50MP+8MP, 20MP |
| OS | Android 16, HyperOS 3 | Android 16, HyperOS 3 |