Lokmat AI ची अद्भूत दुनिया: एआय आणि सभोवतालचे पर्यावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 12:07 IST2026-03-03T12:05:33+5:302026-03-03T12:07:19+5:30
Lokmat AI ची अद्भूत दुनिया: एआय आधारित हवामान मॉडेल्स ३० ते ४० टक्के अधिक अचूक अंदाज देतात, जे पारंपरिक पद्धतींपेक्षा प्रभावी ठरतात.

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: एआय आणि सभोवतालचे पर्यावरण
Lokmat AI ची अद्भूत दुनिया: जागतिक तापमान औद्योगिक क्रांतीपासून (१८५०-१९००) आतापर्यंत सुमारे १.१ अंश सेल्सिअस ते १.४ अंश सेल्सिअसने वाढले आहे आणि गेल्या काही वर्षांत ही वाढ अधिक वेगाने झाली आहे, ज्यामुळे गेल्या दशकातील आणि अलीकडील वर्षे सर्वाधिक उष्ण ठरली आहेत. ही वाढ प्रामुख्याने मानवी हस्तक्षेपामुळे (उदा. जीवाश्म इंधनाचा वापर) आणि त्यामुळे उत्सर्जित होणाऱ्या हरितगृह वायूंच्या वाढीमुळे झाली आहे. कार्बन डायऑक्साइडचे (सीओ टू) प्रमाण ४२० पीपीएमच्या पुढे गेले आहे, आणि शहरांतील हवेची गुणवत्ता धोक्याच्या पातळीवर पोहोचली आहे. या सगळ्या समस्यांवर उपाय शोधताना कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आज एआय आधारित हवामान मॉडेल्स ३० ते ४० टक्के अधिक अचूक अंदाज देतात, जे पारंपरिक पद्धतींपेक्षा प्रभावी ठरतात.
हवामान बदल आणि एआय
मशिन लर्निंग मॉडेल्स (एमएल) वापरून उपग्रह (सॅटेलाइट) डेटा, तापमान, वाऱ्याचा वेग, पावसाचा अंदाज आणि माहिती यांचे विश्लेषण करता येते. आज एआय आधारित हवामान मॉडेल्स 30 ते 40 टक्के अधिक अचूक अंदाज देतात, जे पारंपरिक पद्धतींपेक्षा प्रभावी ठरतात. यामुळे चक्रीवादळ, अतिवृष्टी, दुष्काळ यांची पूर्वसूचना (अर्ली वॉर्निंग) आपल्याला मिळते.
जंगल संरक्षणात एआयची भूमिका
एआय कॉम्प्युटर व्हिजन हे तंत्रज्ञान वापरुन जंगलातील कॅमेऱ्यांमधील प्रतिमा तपासल्या जातात. यामुळे बेकायदेशीर वृक्षतोड ओळखता येते. तसेच जंगलातील आग तासभर आधी ओळखता येते. वन्यजीवांच्या हालचाली ट्रॅक करता येतात. आज काही देशांत एआयमुळे वनक्षेत्राचे नुकसान 20-25 टक्के कमी झाले आहे हे महत्त्वाचे.
The Al That Saved the Mango Tree
In Rohan's village, a mango tree was becoming weak and dry. People did not know how to help it. An Al app checked the soil, the weather, and how much water the tree needed. It told the villagers when to water the tree and how much water to use. After some weeks, the mango tree became healthy again and grew new leaves and fruits. Rohan learned that Al can help us understand nature and take better care of it. Technology, when used wisely, can make our world greener. - Ajinkya Deshmukh.
निष्कर्ष
एआय म्हणजे फक्त चॅटजीपीटी किंवा मोबाईल अॅप नाही. तो डेटा गणित पर्यावरण विज्ञान यांचा संगम आहे. योग्य नियोजन आणि जबाबदार वापर केला, तर एआय पर्यावरणासाठी सर्वात शक्तिशाली साधन ठरु शकतो. तंत्रज्ञान निसर्गाविरुद्ध नाही, ते निसर्गासाठी वापरले तरच त्याचे खरे मूल्य आहे.
इंजि. अविनाश जाधव (एआय आणि टेक एज्युकेटर)