Lokmat AI ची अद्भूत दुनिया: प्रजासत्ताक मूल्यांतून कृत्रिम बुद्धिमत्तेकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 10:53 IST2026-03-10T10:52:38+5:302026-03-10T10:53:10+5:30

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: ग्रामीण भागातील तरुणही ऑनलाइन कौशल्य प्रशिक्षण, डिजिटल कोर्सेस आणि स्टार्टअप परिसंस्थेमुळे स्पर्धा करू शकतात.

lokmat ai series from republican values to artificial intelligence | Lokmat AI ची अद्भूत दुनिया: प्रजासत्ताक मूल्यांतून कृत्रिम बुद्धिमत्तेकडे

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: प्रजासत्ताक मूल्यांतून कृत्रिम बुद्धिमत्तेकडे

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन हा केवळ संविधान स्वीकारल्याचा ऐतिहासिक दिवस नाही, तर भारताच्या लोकशाही मूल्यांचा, नागरिकांच्या हक्क-कर्तव्यांचा आणि भविष्यातील दिशेचा उत्सव आहे. आजच्या डिजिटल युगात या सर्वांचा थेट संबंध एआयशी जोडला गेला आहे. विशेषतः भारतीय तरुण या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी आहेत. संविधान निर्मात्यांनी नागरिकांना मूलभूत हक्क दिले आणि त्याच बरोबर वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचे कर्तव्यही अधोरेखित केले. त्या काळी एआय अस्तित्वात नसली तरी ज्ञान, संशोधन, विवेक आणि नवोन्मेष यांना महत्त्व देण्यात आले. आज कृत्रिम बुद्धिमत्ता ही त्या दूरदृष्टीची आधुनिक साकार रूप आहे. ग्रामीण भागातील तरुणही ऑनलाइन कौशल्य प्रशिक्षण, डिजिटल कोर्सेस आणि स्टार्टअप परिसंस्थेमुळे स्पर्धा करू शकतात.

आव्हाने

मात्र या संधींसोबत आव्हानेही आहेत. कौशल्यातील दरी, बेरोजगारीची भीती, चुकीची माहिती, डिजिटल व्यसन, गोपनीयतेचे प्रश्न आणि नैतिकतेचा अभाव ही आजची वास्तव समस्या आहे. एआयचा गैरवापर समाजात असमानता वाढवू शकतो, म्हणूनच येथे नागरिकांची जबाबदारी महत्त्वाची ठरते. तंत्रज्ञानाचा विवेकी, नैतिक आणि समाजहितासाठी वापर करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

नैतिक एआय

प्रजासत्ताक दिन आपल्याला भूतकाळाची जाणीव, वर्तमानाची जबाबदारी आणि भविष्याची दिशा देतो. कृत्रिम बुद्धिमत्ता ही भारताच्या प्रगतीचे प्रभावी साधन आहे आणि भारतीय तरुण ही तिची खरी ताकद आहेत. सजग नागरिक, जबाबदार तरुण आणि नैतिक एआय यांच्याच समन्वयातून सशक्त, समतोल आणि उज्ज्वल भारत घडेल. प्रजासत्ताक मूल्ये ही भारताची दिशा आहेत आणि कृत्रिम बुद्धिमत्ता हे प्रगतीचे साधन. दोन्हींचा समन्वय साधला, तर भारत अधिक सक्षम, समतोल आणि उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करेल.

डिजिटल शिस्त

हक्क आणि कर्तव्य यांचा समतोल राखणे हे लोकशाहीचे बळ आहे. नागरिकांना सेवा, माहिती आणि संधी मिळण्याचा हक्क आहे. पण त्याच वेळी डिजिटल शिस्त, सत्यता, सहिष्णुता आणि संविधानिक मूल्ये आदर राखण्याची जबाबदारीही आहे. एआय निर्णयप्रक्रिया सुलभ करु शकते. मानवी संवेदना, न्याय व समता केंद्रस्थानी असली पाहिजे.

युवकांसाठी संदेश

तरुण हा तंत्रज्ञानाचा वापरकर्ता नसून भविष्याचा शिल्पकार आहे. एआय शिकणे, स्टार्टअप्स उभारणे आणि समाजाच्या समस्या सोडवणे ही राष्ट्रसेवा आहे. संविधानाचा आदर, लोकशाही मूल्यांची जपणूक आणि सामाजिक बांधिलकी यांसोबत तंत्रज्ञानाचा वापर झाला, तर भारत जागतिक नेतृत्व करु शकतो.

तरुणांसाठी संधी

सद्यःस्थिती पाहिली, तर भारतातील तरुण डिजिटलदृष्ट्या अधिक सक्षम होत आहेत. स्मार्टफोन, इंटरनेट, ऑनलाइन शिक्षण, कोडिंग प्लॅटफॉर्म्स, स्टार्टअप संस्कृती आणि डिजिटल उपक्रमांमुळे तरुणांना नवी दारे खुली झाली आहेत. शेती, आरोग्य, शिक्षण, उद्योग, प्रशासन, संरक्षण आणि सेवा क्षेत्रात एआयचा वापर वाढत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनातही तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि युवाशक्तीचे दर्शन घडते. हे भारत बदलत असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. तरुणांसाठी संधी अभूतपूर्व आहेत. एआय, विदा विज्ञान (डेटा सायन्स), रोबोटिक्स, सायबर सुरक्षा, ऑटोमेशन, स्टार्टअप्स आणि संशोधन या क्षेत्रांत रोजगार व उद्योजकतेच्या मोठ्या शक्यता निर्माण झाल्या आहेत. ग्रामीण भागातील तरुणही ऑनलाइन कौशल्य प्रशिक्षण, डिजिटल कोर्सेस आणि स्टार्टअप परिसंस्थेमुळे जागतिक पातळीवर स्पर्धा करु शकतात.

- शशिकांत शिंदे, सहायक प्राध्यापक, यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा.

Web Title : लोकमत एआई: गणतंत्र मूल्य भारत की कृत्रिम बुद्धिमत्ता यात्रा का मार्गदर्शन।

Web Summary : एआई भारत की प्रगति को सशक्त करता है, लोकतांत्रिक मूल्यों को तकनीकी उन्नति के साथ मिलाता है। युवा नवाचार, नैतिक एआई उपयोग और संतुलित भविष्य के लिए डिजिटल अनुशासन को बढ़ावा देते हैं। कौशल, नैतिकता और जिम्मेदार तकनीक उपयोग महत्वपूर्ण हैं।

Web Title : Lokmat AI: Republic values guiding India's artificial intelligence journey.

Web Summary : AI empowers India's progress, blending democratic values with technological advancement. Youth are key, fostering innovation, ethical AI use, and digital discipline for a balanced future. Skills, ethics, and responsible tech use are crucial.