शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
3
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
4
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
5
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
6
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
7
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
8
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
9
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
10
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
12
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
13
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
14
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
15
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
16
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
17
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
18
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
19
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
20
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज

Lok Sabha Election 2019 : आचारसंहितेचं उल्लंघन झाल्यास 'या' अ‍ॅपवर करा तक्रार 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 1:07 PM

लोकसभा निवडणुकीत आचारसंहिता भंग केल्याच्या तक्रारी व गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग आता नागरिकांची मदत घेणार आहे. त्यासाठी आयोगाने 'सीव्हिजिल' अ‍ॅप विकसित केले आहे.

ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीत आचारसंहिता भंग केल्याच्या तक्रारी व गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग आता नागरिकांची मदत घेणार आहे. आचारसंहितेचं उल्लंघन केल्याची तक्रार करण्यासाठी निवडणूक आयोगाने 'सीव्हिजिल' हे अ‍ॅप लाँच केले आहे. गुगल प्ले स्टोअर वरून 'सीव्हिजिल' अ‍ॅप डाऊनलोड करता येईल.

नवी दिल्ली - देशाचंच नव्हे तर जगाचं लक्ष लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीचं वेळापत्रक अखेर जाहीर झालं आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही हे मानाचं बिरूद मिरवणाऱ्या आपल्या देशाच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगानं केली आहे. एकूण सात टप्प्यात ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. लोकसभा निवडणुकीत आचारसंहिता भंग केल्याच्या तक्रारी व गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग आता नागरिकांची मदत घेणार आहे. त्यासाठी आयोगाने 'सीव्हिजिल' अ‍ॅप विकसित केले आहे. आचारसंहितेचं उल्लंघन केल्याची तक्रार करण्यासाठी निवडणूक आयोगाने 'सीव्हिजिल' हे अ‍ॅप लाँच केले आहे. 

'सीव्हिजिल' अ‍ॅपच्या मदतीने नागरिकांना निवडणुकीतील चुकीच्या गोष्टींची माहिती प्रशासनाला देणे सोपं होणार आहे. तसेच फोटो अथवा दोन मिनिटांपर्यंतचा व्हिडीओ अपलोड करून या अ‍ॅपच्या साहाय्याने आचारसंहितेच्या उल्लंघनाबद्दलची माहिती देता येणार आहे. यासाठी मोबाईलमध्ये इंटरनेट आणि जीपीएस लोकेशन असणे आवश्‍यक आहे. फोटो अपलोड झाल्यावर ते लोकेशन संबंधित मतदारसंघातील भरारी पथकाला समजणार आहे. फोटो अपलोड केल्यावर युजर्सना एक युनिक आयडी मिळणार आहे. अ‍ॅपद्वारे आलेली तक्रार योग्य असेल, तर 100 मिनिटांत तिचे निवारण होणार आहे. तसेच या अ‍ॅपच्या माध्यमातून तक्रार करणाऱ्या व्यक्तीचे नाव गुप्त ठेवले जाणार आहे. गुगल प्ले स्टोअर वरून 'सीव्हिजिल' अ‍ॅप डाऊनलोड करता येईल.

 17 व्या लोकसभेसाठी देशातील 29 राज्यांमध्ये 7 टप्प्यांमध्ये मतदान होणार असून या महासंग्रामाचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. पहिल्या टप्प्यातील मतदानाला 11 एप्रिल रोजी सुरुवात होणार असून मतमोजणी 23 मे रोजी होणार आहे. या लोकसभा निवडणुकीत सुमारे 90 कोटी मतदार देशाचा नेता, देशाचं सरकार ठरवणार आहेत. 

सावधान ! उमेदवारांच्या सोशल मीडिया अकाऊंवर 'वॉच', राजकीय जाहिराती निवडणूक खर्चातनिवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांची घोषणा करताना आचारसंहिता आणि निवडणूक काळासाठी बनविण्यात आलेल्या नियमावलींची माहिती दिली. त्यानुसार उमेदवारांना पॅनकार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच यंदाच्या निवडणुकीत सोशल मीडियाच्या वापरावरही आयोगाची करडी नजर असणार असल्याचे आयोगाने म्हटले आहे. उमेदवारांना त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटची माहिती आयोगाला द्यावी लागणार आहे. 

आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर करताच, देशात आचारसंहिता लागू झाली आहे. या आदर्श आचारसंहितेचे सर्व नियम सोशल मीडियावरच्या प्रचारालाही लागू होणार आहेत. त्यामुळे आपल्या नेत्याचा प्रचार करताना कार्यकर्त्यांना किंवा त्यांच्या सोशल मीडिया हँडलर्संना काळजीने वागावे लागणार आहे. निवडणूक आयोग प्रत्येक उमेदवाराच्या सोशल मीडिया अकाउंटची तपासणी करणार आहे. तसेच, पेड न्यूज आणि सोशल मीडियावरचा खर्चही निवडणूक खर्चात गृहीत धरला जाणार आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकtechnologyतंत्रज्ञानElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगSocial Mediaसोशल मीडिया