भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 13:03 IST2025-10-03T13:03:11+5:302025-10-03T13:03:23+5:30
Lava Agni 4 tech news: नोव्हेंबर 2025 मध्ये लाँच होणार हा स्मार्टफोन: 120Hz OLED डिस्प्ले आणि फ्लॅगशिप UFS 4 स्टोरेज मिळणार; चीनी कंपन्यांना थेट आव्हान.

भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...
भारतातील स्मार्टफोन निर्माता कंपनी Lava Agni 4 स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात लाँच होणार आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये हा स्मार्टफोन मध्यम-उच्च किंमत श्रेणी (सुमारे ₹25,000) मध्ये अनेक आकर्षक आणि प्रीमियम फीचर्स घेऊन येत आहे. यामुळे चिनी कंपन्यांना टक्कर मिळणार आहे.
Lava Agni 4 मध्ये पहिल्यांदाच मेटल फ्रेम दिली जाणार आहे. एका फ्लॅगशिप फोनसारखा 'प्रीमियम' लूक आणि फील मिळेल. याशिवाय, फोनच्या मागील बाजूस 'पिल-शेप्ड' ड्युअल कॅमेरा सेटअप असेल, जो Google Pixel स्मार्टफोन्समध्ये दिसणाऱ्या डिझाइनशी मिळताजुळता आहे. लीक झालेल्या माहितीनुसार, Lava Agni 4 मध्ये 7,000 mAh पेक्षा जास्त क्षमतेची बॅटरी दिली जाऊ शकते.
या फोनला २५,००० रुपयांच्या रेंजमध्ये रियलमी, मोटोरोला आणि शाओमी सारख्या ब्रँड्सशी स्पर्धा करावी लागणार आहे.
फ्लॅगशिप-लेव्हल स्पेसिफिकेशन्स
डिस्प्ले: यात 6.7 इंचाचा फुल HD+ फ्लॅट OLED पॅनल मिळेल, जो 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल.
प्रोसेसर: स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 8350 चिपसेट दिला जाण्याची शक्यता आहे.
स्टोरेज: यात फ्लॅगशिप-लेव्हलचे UFS 4 स्टोरेज मिळेल, ज्यामुळे डेटा ट्रान्सफर आणि ॲप लोडिंगचा वेग खूप जलद असेल.
कॅमेरा: फोटोग्राफीसाठी, 50 मेगापिक्सेलचा मेन कॅमेरा (OIS सपोर्टसह) आणि 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा मिळण्याची अपेक्षा आहे. सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे.