शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
6
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
7
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
8
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
9
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
10
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
11
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
12
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
13
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
14
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
15
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
16
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
17
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
18
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
19
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
20
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी

आज मध्यरात्री Samsung Galaxy S10 लाँच करणार; पहा काय असेल खास

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 12:44 PM

दक्षिण कोरियाची स्मार्टफोन उत्पादक कंपनी Samsung ने आज मध्यरात्रीनंतर सॅन फ्रान्सिस्कोमध्ये Unpacked 2019 या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

मुंबई : दक्षिण कोरियाची स्मार्टफोन उत्पादक कंपनी Samsung ने आज मध्यरात्रीनंतर सॅन फ्रान्सिस्कोमध्ये Unpacked 2019 या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावेळी सॅमसंग Galaxy S10 ही प्रिमिअम स्मार्टफोन सिरिज लाँच करणार आहे. यामध्ये Galaxy S10, S10+ आणि S10e असणार आहेत. याशिवाय पहिला फोल्डेबल फोन Galaxy Fold हा लाँच केला जाण्याची शक्यता आहे. 

भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 12.30 वाजता हा कार्यक्रम सुरु होणार आहे. या इव्हेंटमध्ये Galaxy Buds आणि Galaxy Watch Active smartwatch ही दाखविले जाण्याची शक्यता आहे. 

Galaxy S10e आणि S10+ मध्ये अनुक्रमे 6.1 इंच आणि 6.4 इंचाचा क्युएचडी प्लस इन्फिनिटी- ओ सुपर अमोल्ड कर्व्हड डिस्प्ले असणार आहे. त्यासोबत गोरिल्ला ग्लास 6 ची सुरक्षा दिली जाणार आहे. दोन्ही फोनमध्ये वरती उजव्या बाजुला सेल्फी कॅमेरासाठी होल असणार आहे. तर एस10 मध्ये सर्क्युलर कटआऊटबरोबर 10 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात येणार आहे. S10+ मध्ये ड्युअल सेल्फी कॅमेरासाठी वाईड कटआऊट असणार आहे. पहिला सेन्सर 10 मेगापिक्सल आणि दुसरा सेन्सर 8 मेगापिक्सलचा असणार आहे. दोन्ही फोनमधील बॅकपॅनेल प्रीज्म व्हाइट, प्रीज्म ग्रीन आणि प्रीज्म ब्लैक ग्लासचे असणार आहे.

या फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा असणार आहे. यामध्ये LED फ्लॅशसोबत हार्ट रेट सेन्सरही असणार आहे. यामध्ये इनडिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर असणार आहे. Galaxy S10 मध्ये 6 आणि 8 जीबी रॅमसर 128/512 जीबी स्टोरेज असणार आहे. तर  S10+ मध्ये 12 जीबी रॅम आणि 1 टीबी स्टोरेज असणार आहे. 

फोल्डेबल फोन यंदाचे आकर्षण म्हणजे फोल्डेबल फोन Samsung Galaxy F असणार आहे. या फोनमध्ये दोन स्क्रीन असणार असून एक आतल्या बाजुला व दुसरी बाहेरच्या बाजुला असणार आहे. स्क्रीनचा कव्हर डिस्प्ले 4.58 इंचाचा देण्यात येणार आहे. ज्याच्या रेशो 21:9 आणि रिझोल्यूशन 840X1960 असण्याची शक्यता आहे. तसेच प्रायमरी डिस्प्ले 7.3 इंचाचा असण्याची शक्यता आहे. 12 जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेज असणार आहे. मेमरी कार्डच्या वापराने 1024GB स्टोरेज वाढविता येणार आहे. 

टॅग्स :samsungसॅमसंगMobileमोबाइल