कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 16:12 IST2025-09-11T16:12:33+5:302025-09-11T16:12:56+5:30

कृत्रिम बुद्धिमत्तेचा अर्थात AI चा वापर करून विकसित केलेल्या या टूलद्वारे वापरकर्त्यांना विविध डिजिटल कामे अधिक कार्यक्षम, सोपी आणि वेळेची बचत करणारी होणार आहेत.

Kolhapur's Sanket Patil has created a powerful AI tool; Data scientists and analysts will benefit | कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा

कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा

कोल्हापूरच्या संकेत पाटील या शेतकरी पुत्रानं एआय तंत्रज्ञानाच्या मदतीनं नाविन्यपूर्ण Sifra AI हे टूल तयार केले आहे. डी.वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी असलेल्या संकेतने शेतकरी पार्श्वभूमीतून उभे राहत तंत्रज्ञान क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा अर्थात AI चा वापर करून विकसित केलेल्या या टूलद्वारे वापरकर्त्यांना विविध डिजिटल कामे अधिक कार्यक्षम, सोपी आणि वेळेची बचत करणारी होणार आहेत.

या टूलमुळे फक्त डेटा सेट वापरून कोणतेही ग्राफिकल व्हिसुअलाईजेशन, चार्ट आदी गोष्टी करता येणार आहेत. हवे असल्यास एरर नसणारा नवीन कोड किंवा मशीन लर्निंग मॉडेल देखील तयार करता येणार आहे. विशेष म्हणजे या AI टूलला भारतीय कॉपीराइट मिळाले आहे. 

संकेतच्या या कामगिरीमुळे ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेल्या आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी नाळ जुळवलेल्या संकेतच्या या प्रयत्नाचे सर्वत्र कौतुक होत आहे. शेतकरी कुटुंबातून आलेल्या तरुणाने तंत्रज्ञानाच्या जोरावर नवी संधी कशा निर्माण होऊ शकतात, याचे उदाहरण सिफ्रा एआय टूलमधून दिले आहे. या टूलचे ॲप लवकरच गुगल प्ले स्टोअरवर येणार असल्याचे संकेत याने सांगितले आहे.

Web Title: Kolhapur's Sanket Patil has created a powerful AI tool; Data scientists and analysts will benefit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.