Jio युझर्ससाठी गुड न्यूज! आता केवळ ७५ रुपयांत मिळणार अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा
By देवेश फडके | Updated: January 10, 2021 14:16 IST2021-01-10T14:12:58+5:302021-01-10T14:16:12+5:30
जिओ युझर्सना केवळ ७५ रुपयांत अनलिमिटेड कॉल आणि डेटा मिळणार आहे. जिओचा हा सर्वांत स्वस्त प्लान असून, 'All in One' अंतर्गत हा प्लान देण्यात आला आहे.

Jio युझर्ससाठी गुड न्यूज! आता केवळ ७५ रुपयांत मिळणार अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा
नवी दिल्ली : Reliance Jio ने आपल्या युझर्ससाठी खास ऑफर आणली आहे. आता जिओ युझर्सना केवळ ७५ रुपयांत अनलिमिटेड कॉल आणि डेटा मिळणार आहे. जिओचा हा सर्वांत स्वस्त प्लान असून, 'All in One' अंतर्गत हा प्लान देण्यात आला आहे.
जिओफोन युझर्सना 4G नेटवर्क अंतर्गत ७५ रुपयांचा देण्यात येणारा हा प्लान सर्वांत स्वस्त असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी ४९ रुपयांचा प्लान जिओकडून उपलब्ध करून देण्यात आला होता. मात्र, त्याचा दर वाढवून आता ७५ रुपये करण्यात आला आहे. या प्लानची वैधता २८ दिवसांची असेल.
७५ रुपयांचा जिओफोन टॅरिफ प्लान
'All in One' सेक्शन अंतर्गत अनलिमिटेड कॉम्बो प्लान जिओकडून युझर्ससाठी ७५ रुपयांपासून सुरू होऊन १८५ रुपयांपर्यंत हे प्लान उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. 'All in One' अंतर्गत येणाऱ्या सर्व प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. ७५ रुपयांच्या प्लानमध्ये युझर्सना देशातील कोणत्याही नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एमबी डेटा आणि ५० एसएमएस ऑफर केले जात आहेत.
जिओ युझर्ससाठी ७५ रुपयांनंतर १२५ रुपयांचा प्लान देण्यात आला आहे. यामध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, दररोज ५०० एमबी डेटा आणि ३०० एसएमएस ऑफर केले जात आहे. यानंतर १५५ रुपयांचा प्लान जिओकडून देण्यात आला आहे. यामध्ये जिओ युझर्सना अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, दररोज १ जीबी डेटा आणि १०० एसएमएस ऑफर केले जात आहेत.
'All in One'मधील सर्वांत शेवटचा प्लान हा १८५ रुपयांना दिला जात आहे. यानुसार जिओ युझर्सना अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, दररोज २ जीबी डेटा आणि १०० एसएमएस ऑफर केले जात आहेत. एवढेच नव्हे तर जिओफोन प्लामध्ये जिओ अॅप्स जसे की, जिओटीव्ही आणि जिओ सिनेमा यांचा अॅक्सेस मोफत दिला जात आहे.