Jio चा 155 रुपयांचा शानदार रिचार्ज प्लॅन; डेटासह मिळेल अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 01:13 PM2022-09-18T13:13:41+5:302022-09-18T13:14:09+5:30

Jio : जिओने तुमच्यासाठी एक खास रिचार्ज प्लॅन आणला आहे, ज्यामध्ये अनलिमिटेड कॉलिंगपासून ते इंटरनेटपर्यंत सर्व काही मिळणार आहे.

jio rs 155 prepaid plan is offering amazing benifits to users | Jio चा 155 रुपयांचा शानदार रिचार्ज प्लॅन; डेटासह मिळेल अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा 

Jio चा 155 रुपयांचा शानदार रिचार्ज प्लॅन; डेटासह मिळेल अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा 

googlenewsNext

नवी दिल्ली : जर तुम्ही जिओ (Jio) प्रीपेड कनेक्शन वापरत असाल आणि तुम्हाला दर महिन्याला रिचार्जचा खर्च कमी करायचा असेल, तर आज आम्ही तुम्हाला हा खर्च कसा कमी करू शकतो, हे सांगणार आहोत. दरम्यान, जिओने तुमच्यासाठी एक खास रिचार्ज प्लॅन आणला आहे, ज्यामध्ये अनलिमिटेड कॉलिंगपासून ते इंटरनेटपर्यंत सर्व काही मिळणार आहे. इतकेच नाही तर  या प्लॅनची किंमत खूपच किफायतशीर असणार आहे. त्यामुळे तुमचा मासिक खर्चही कमी होईल.

Jio Prepaid Recharge Rs 155
जर तुम्हाला जिओच्या प्रीपेड प्लॅनबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल, तर आम्ही तुम्हाला सांगतो की, जिओच्या 155 रुपयांच्या प्लॅनमध्ये शानदार बेनिफिट्स आहेत. ग्राहक सुद्धा हा प्लॅन मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. त्याचे कारण म्हणजे या प्लॅनमध्ये मिळणारे बेनिफिट्स. हा प्लॅन ग्राहकांना परवडणाऱ्या रेंज येतो, त्यामुळे ग्राहक तो रिचार्ज करत आहेत. या प्लॅनच्या बेनिफिट्सबद्दल तसेच त्याच्या ऑफर्सबद्दल, जाणून घेऊया...

जिओच्या 155 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर, ग्राहकांना या प्लॅनमध्ये 28 दिवसांची व्हॅलिडिटी दिली जाते. अशा परवडणाऱ्या प्लॅनमध्ये इतके दिवसांची व्हॅलिडिटी मिळणे ही खरोखरच मोठी गोष्ट आहे. असे अनेक प्लॅन आहेत, जे इतक्या कमी किमतीत 28 दिवसांची व्हॅलिडिटी देत नाहीत. याचबरोबर, या प्लॅनमध्ये एकूण  2GB Data दिला जाते. तसेच, यामध्ये अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग सुद्धा मिळतो. एकूणच, या प्लॅनमध्ये तुम्हाला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी दिल्या आहेत. जर तुम्हाला हा प्लॅन अॅक्टिव्ह करायचा असेल तर हा तुमच्यासाठी एक चांगला ऑप्शन ठरू शकतो.

Web Title: jio rs 155 prepaid plan is offering amazing benifits to users

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.