शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

2021 Jeep Compass भारतात लाँच; पाहा किती आहे किंमत आणि काय आहेत बदल

By जयदीप दाभोळकर | Published: January 27, 2021 6:11 PM

पाहा काय मिळणार अत्याधुनिक फीचर्स

ठळक मुद्देSUV मध्ये जीपच्या सिग्नेचर 7 स्लॉट ग्रीलमध्ये फ्रन्ट कॅमेरा देण्यात आला आहे.SUV मध्ये पेट्रोल आणि डिझेल असे दोन्ही पर्याय देण्यात आले आहेत.

2021 Jeep Compass ही कारभारतात लाँच करण्यात आली आहे. जानेवारी महिन्यात ही कार अनवील करण्यात आली होती. Hyundai Tucson, Skoda Karoq, Volkswagen T-Roc, Skoda Karoq, 2020 Tata Harrier आणि 2021 MG Hector फेसलिफ्ट या कार्सना जीप टक्कर देणार आहे. कंपनीनं 2021 Jeep Compass या मॉडेलमध्ये काही बदल केले आहेत. SUV मध्ये जीपच्या सिग्नेचर 7 स्लॉट ग्रीलमध्ये फ्रन्ट कॅमेरा देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त कंपनीनं हेडलँप्समध्ये काही बदल केले आहेत. तर इंटिग्रेटेड LED DRLs, नवे फ्रन्ट बंपर, नवी स्किड प्लेट आणि फॉग लँपची जागा यात काही बदल करण्यात आले आहेत. नव्या जीप कंपासमध्ये डायमंड कट फिनिशसोबतच नव्या डिझाईनचे ५ स्पोक अलॉय व्हिल्स आहेत. तसंच रिअर डिझाईन सध्याच्या कारप्रमाणेच आहे. परंतु आता एसयूव्ही पॉवर्ड टेलगेट मिळणार आहे. या कारची दिल्लीतील एक्स शोरूम किंमत 16.99 लाख रूपयांपासून ते 24.49 लाख रूपये इतकी आहे. इंजिन आणि पॉवर2021 Jeep Compass SUV मध्ये पेट्रोल आणि डिझेल असे दोन्ही पर्याय देण्यात आले आहेत. पेट्रोल इंजिन 1.4 लिटर टर्बो पेट्रोल युनिट आहे जे 163hp पॉवर आणि 250Nm पीक टॉर्क जनरेट करतं. तर डिझेल इंजिन 2.0 लिटर मल्टिजेट टर्बो डिझेल युनिट आहे जे 173 hp पॉवर आणि 350 Nm चं टॉर्क जनरेट करतं. एसयूव्हीच्या हायर स्पेसिफिक व्हर्जनमध्ये फोर व्हिल ड्राईव्ह सिस्टम देण्यात आलं आहे. ऑटो, स्नो, मड आणि सँड टेरेन सेटिंग्स चालकाला निवडता येणार आहेत. 

इंटिरिअर फीचर्स2021 Jeep Compass SUV चं संपूर्ण केबिन एकदम नवं आहे. या कारच्या नव्या टॉप ट्रिम S व्हेरिअंटमध्ये ऑल ब्लॅक इंटिरिअरसह प्रिमिअम लूक देण्यात आलं आहे. तसंच याक UConnect 5 सह 10 इंचाचा फ्लोटिंग टचस्क्रिन इन्फोटेन्मेंट सिस्टमसह नवा डॅशबोर्डही देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त इन्फोटेन्मेंट सिस्टम Apple CarPlay आणि Android Auto ला सपोर्ट करते. नवं स्टेअरिंग व्हिल, 10.25 इंट डिजिटल इन्स्ट्रूमेंट क्लस्टर, वायरलेस स्मार्टफोन चार्जर, ड्युअल पेन पॅनोरॅमिक सनरूफ, इलेक्ट्रिक ८ वे पॉवर अॅडजेस्टेबल फ्रन्ट सीट्स, क्रुझ कंट्रोल, ३६० डिग्री पार्किंग कॅमेरा, ९ स्पीकर ऑडियो सिस्टम, रिमोट कीलेस एन्ट्री असे अनेक फिचर यात देण्यात आले आहे.  

कनेक्टेड कार टेक्नॉलॉजीमुळे चालकाला जीप कंपासशी मोबाईल अॅपसोबत रिमोटली इंटरॅक्ट करता येईल. याद्वारे डोअर लॉक अनलॉक, व्हेईकल हेल्थ रिपोर्ट, ड्रायव्हर अॅनालिटिक्स, लोकेशन फीचर्स, अपघात झाल्यास इमरजन्सी कॉन्टॅक्टसाठी सेफ्टी सर्विस फीचर, स्टोलन व्हेईकल असिस्ट अशा सुविधा याद्वारे अॅक्सेस करता येऊ शकता. सेफ्टी फीचर्स2021 Jeep Compass मध्ये ५० सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये सर्वाधिक ६ एअरबॅग्स, पॅनिक ब्रेक असिस्ट, इलेक्ट्रॉनिक रोल ओव्हर मिटीगेशन, रेजी अलर्ट ब्रेकिंग, हिल होल्ड, हिल डेसेंच कंट्रोल आणि ऑटो होल्डसारख्या फीचर्सचा समावेश आहे.

टॅग्स :carकारJeepजीपMahindraमहिंद्राMG Motersएमजी मोटर्सHyundaiह्युंदाईIndiaभारत