20 तासांच्या बॅकअपसह सर्वात किफायतशीर ट्रू वायरलेस स्टीरियो JBL इयरबड्स भारतात सादर
By सिद्धेश जाधव | Updated: August 19, 2021 19:37 IST2021-08-19T19:37:38+5:302021-08-19T19:37:48+5:30
JBL Wave 100 TWS: JBL Wave 100 TWS बड्स टॉप-लेस चार्जिंग केससह बाजारात आले आहेत, म्हणजे चार्जिंग केसवर कव्हर नाही. या डिजाईनमुळे यांचा वापर सोप्पा होतो असे कंपनीने म्हटले आहे.

20 तासांच्या बॅकअपसह सर्वात किफायतशीर ट्रू वायरलेस स्टीरियो JBL इयरबड्स भारतात सादर
प्रसिद्ध ऑडिओ ब्रँड JBL ने भारतातील सर्वात किफायतशीर ट्रू वायरलेस स्टीरियो (TWS) इयरबड्स सादर केले आहेत. कंपनीने JBL Wave 100 इयरबड्स 3,499 रुपयांमध्ये सादर केले आहेत. हे बड्स Black, White आणि Blue रंगात विकत घेता येतील. अर्गोनॉमिक डिजाईनसह सादर करण्यात आलेले हे बड्स 21 ऑगस्टपासून फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध होतील.
JBL Wave 100 TWS चे स्पेसिफिकेशन्स
हे बड्स टॉप-लेस चार्जिंग केससह बाजारात आले आहेत, म्हणजे चार्जिंग केसवर कव्हर नाही. या डिजाईनमुळे यांचा वापर सोप्पा होतो असे कंपनीने म्हटले आहे. यात हॅन्ड्स फ्री कॉलिंग आणि व्हॉइस असिस्टंट सपोर्ट देखील देण्यात आला आहे. टॉपलेस डिजाईनमुळे चार्जिंग केसमध्ये शक्तिशाली चुंबक देण्यात आले आहेत, जे ईयरबड्स केसमधून पडू देत नाहीत.
या इयरबड्समध्ये 8mm डायनॅमिक ड्रायव्हर्स देण्यात आले आहेत. हे बड्स डीप बेस साउंड देतील, असा कंपनीने दावा केला आहे. या डिवाइसमध्ये ड्युअल कनेक्ट टेक्नोलॉजी मिळते, तसेच कनेक्टिविटीसाठी ब्लूटूथ v5 सपोर्ट देण्यात आला आहे. हे जेबीएल बड्स अँड्रॉइड आणि iOS दोन्ही डिव्हाइसेससह वापरता येतात. यातील 550mAh ची बॅटरी 20 तासांचा बॅकअप देते. सिंगल चार्जमध्ये हे बड्स 5 तास चालतात. यात डुअल EQ सपोर्ट देखील मिळतो. बड्सच्या मागे देण्यात आलेल्या बटन्सच्या माध्यमातून म्युजिक आणि व्हॉल्युम कंट्रोल करता येईल.