Xiaomi Redmi Note 11 सीरीजला थेट आव्हान देणार iQOO U5 सीरीज; मीडियाटेक प्रोसेसरची घेणार मदत  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2021 03:23 PM2021-11-01T15:23:00+5:302021-11-01T15:23:37+5:30

Upcoming iQOO U5, Neo 6 SE And Neo 5s: लवकरच आयक्यू ब्रँड अंतर्गत iQOO U5, Neo 6 SE आणि Neo 5s असे तीन स्मार्टफोन सादर केले जातील. यातील iQOO U5 थेट Xiaomi Redmi Note 11 सीरिजला टक्कर देण्यसाठी सादर केला जाऊ शकतो.

Iqoo to launch iqoo u5 series smartphones soon  | Xiaomi Redmi Note 11 सीरीजला थेट आव्हान देणार iQOO U5 सीरीज; मीडियाटेक प्रोसेसरची घेणार मदत  

Xiaomi Redmi Note 11 सीरीजला थेट आव्हान देणार iQOO U5 सीरीज; मीडियाटेक प्रोसेसरची घेणार मदत  

Next

गेले कित्येक दिवस शांत असलेला iQOO ब्रँड लवकरच पुन्हा सक्रिय होणार आहे. कंपनी येत्या काही दिवसांत दोन स्मार्टफोन सीरिज सादर करू शकते. कंपनी चीनमध्ये iQOO Neo 6 SE स्मार्टफोन आणि iQOO U5 असे दोन फोन सादर करण्याची योजना बनवत आहे. यातील iQOO U5 सीरीज मिड रेंजमध्ये लाँच केली जाईल. तर नियो 6 एसई एक मिड प्रीमियम स्मार्टफोन असेल.  

iQOO U5 

आगामी iQOO U5 सीरीज थेट शाओमीच्या लेटेस्ट मिड रेंज स्मार्टफोन Redmi Note 11 series ला टक्कर देईल, असा दावा चिनी टिपस्टरने केला आहे. गेल्या आठवड्यात रेडमी नोट 11 सीरीज चीनमध्ये लाँच करण्यात आली आहे. iQOO U5 सीरीजमध्ये किती स्मार्टफोन येतील, हे मात्र अद्याप समजले नाही. परंतु यातील एक स्मार्टफोन मीडियाटेकच्या Dimensity 810 चिपसेटसह सादर केला जाईल, असे टिपस्टरने सांगितले आहे. iQOO U5 series यावर्षीच्या अखेरपर्यंत लाँच केली जाऊ शकते.  

iQOO Neo 6 SE 

तर नोव्हेंबरमध्ये मिड प्रीमियम कॅटेगरीमध्ये Neo सीरिजचा स्मार्टफोन येऊ शकतो. iQOO Neo 6 SE स्मार्टफोन Snapdragon 778G Plus चिपसेटसह सादर केला जाऊ शकतो. तसेच या iQOO स्मार्टफोनमध्ये 66W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल.त्याचबरोबर कंपनी iQOO Neo5s देखील बाजारात आणू शकते. जो Snapdragon 888 SoC आणि 120W फास्ट चार्जिंग अशा भन्नाट स्पेक्ससह सादर केला जाऊ शकतो. हा फोन Snapdragon 870 सह आलेल्या iQOO Neo5 स्मार्टफोनचा अपग्रेड व्हर्जन असेल.  

Web Title: Iqoo to launch iqoo u5 series smartphones soon 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.