iPhone Air च्या किंमतीत मोठी घसरण, आजवरचा सर्वात स्लीम iPhone सर्वात स्वस्त! जाणून घ्या सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 15:09 IST2025-12-03T15:07:39+5:302025-12-03T15:09:35+5:30
iPhone Air : महत्वाचे म्हणजे, या किमतींव्यतिरिक्त, अनेक बँक ऑफर्स, एक्सचेंज बोनस आणि नो-कॉस्ट EMI हे पर्याय देखील उपलब्ध आहेत, यांमुळे हा फोन आणखी कमी किमतीत खरेदी करता येईल.

iPhone Air च्या किंमतीत मोठी घसरण, आजवरचा सर्वात स्लीम iPhone सर्वात स्वस्त! जाणून घ्या सविस्तर
जर आपण iPhone Air खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आपल्यासाठी खास संधी आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये लॉन्च झालेल्या ॲपलच्या आजवरच्या सर्वात स्लीम आणि वजनाने हलक्या असलेला या आयफोनच्या किंमतीत ब्लॅक फ्रायडे मुळे मोठी कपात झाली आहे.
सर्व स्टोरेज व्हेरिएंट्सच्या किंमतीत मोठी कपात -
रिलायन्स डिजिटलवर, iPhone Air च्या सर्व स्टोरेज व्हेरिएंट्सच्या किंमतीत मोठी कपात झाली आहे. आता हे फोन त्यांच्या मूळ लॉन्च किमतीच्या तुलनेत बरेच स्वस्तात विकले जात आहेत. २५६GB चे मॉडेल ११९९०० रुपयांवरून आता १०९९०० मध्ये उपलब्ध आहे. ५१२GB व्हेरिएंट १३९९०० वरून १२८९०० मध्ये मिळत आहे. तर १TB मॉडेल सर्वात स्वस्त झाले असून, ते १५९९०० वरून १४६९०० वर आले आहे.
महत्वाचे म्हणजे, या किमतींव्यतिरिक्त, अनेक बँक ऑफर्स, एक्सचेंज बोनस आणि नो-कॉस्ट EMI हे पर्याय देखील उपलब्ध आहेत, यांमुळे हा फोन आणखी कमी किमतीत खरेदी करता येईल. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या प्रीमियम आयफोन डील्सपैकी ही डील सर्वात आकर्षक आहे.
असे आहेत iPhone Air चे फीचर्स -
ॲपलने बनवलेला हा सर्वात स्लिम आयफोन आहे. या आयफोनची जाडी केवळ ५.६mm एवढी आहे. iPhone १७ सिरीजपेक्षा स्लिम असूनही, त्याला सिरॅमिक शील्ड बॉडी देण्यात आली आहे. हा आयफोन सामान्य ग्लासपेक्षा चारपट अधिक मजबूत असल्याचे बोलले जाते. फोनमध्ये ६.५-इंच सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले, १२०Hz रिफ्रेश रेट आणि ३००० निट्स पीक ब्राइटनेस मिळते. हा पोन क्लाउड व्हाइट (Cloud White), लाईट गोल्ड (Light Gold), स्काय ब्लू (Sky Blue) आणि स्पेस ब्लॅक (Space Black) यासारख्या प्रीमियम कलर्समध्ये उपलब्ध आहे.