ॲपलचा धमाका! भारतात सर्वात स्वस्त 'iPhone 17e' लाँच; ६५,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत प्रीमियम फिचर्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 04:53 IST2026-03-03T04:52:27+5:302026-03-03T04:53:28+5:30
iPhone 17e price in India: ॲपलने भारतात iPhone 17e लाँच केला आहे. ६४,९०० रुपयांपासून सुरू होणाऱ्या या फोनमध्ये A19 चिप, ४८MP कॅमेरा आणि मॅगसेफ सपोर्ट आहे. ११ मार्चपासून विक्री सुरू.

ॲपलचा धमाका! भारतात सर्वात स्वस्त 'iPhone 17e' लाँच; ६५,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत प्रीमियम फिचर्स
टेक दिग्गज ॲपलने भारतीय बाजारपेठेत आपले स्थान अधिक मजबूत करण्यासाठी iPhone 17e लाँच केला आहे. हा स्मार्टफोन विशेषतः त्या ग्राहकांसाठी तयार करण्यात आला आहे, ज्यांना कमी किमतीत आयफोनचा प्रीमियम अनुभव हवा आहे. भारतामध्ये या मॉडेलची निर्मिती मोठ्या प्रमाणावर केली जात असल्याने, याची किंमत अत्यंत स्पर्धात्मक ठेवण्यात आली आहे.
iPhone 17e हा आयफोन १७ मालिकेतील सर्वात परवडणारा फोन असून, मागील वर्षीच्या iPhone 16e चे पुढील व्हर्जन आहे. विशेष म्हणजे, यंदा बेस मॉडेलमध्येच स्टोरेज दुप्पट करण्यात आले आहे. तसेच १६ ई पेक्षा या फोनची किंमत ५००० रुपयांनी वाढविण्यात आली आहे.
iPhone 17e ची किंमत २५६ जीबीसाठी ६४,९०० रुपये, ५१२ जीबीसाठी ८४,९०० रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन ब्लॅक, सॉफ्ट पिंक आणि व्हाईट अशा तीन आकर्षक रंगात उपलब्ध आहे. या फोनचे प्री-ऑर्डर सुरू झाले असून, ११ मार्च २०२६ पासून ॲपलची वेबसाइट आणि अधिकृत रिटेलर्सकडे याची विक्री सुरू होईल.
डिस्प्ले
६.१ इंचाचा सुपर रेटिना XDR (OLED) डिस्प्ले, ज्यावर नवीन 'सिरॅमिक शील्ड २' चे संरक्षण आहे. हे संरक्षण जुन्या मॉडेलपेक्षा ३ पट अधिक मजबूत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
प्रोसेसर: शक्तिशाली A19 चिप (8GB RAM सह) जी ॲपल इंटेलिजन्सला सपोर्ट करते.
कॅमेरा: मागील बाजूस ४८ मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा असून, समोर १२ मेगापिक्सेलचा ट्रू-डेप्थ कॅमेरा देण्यात आला आहे.
मॅगसेफ सपोर्ट: आयफोन १६ई मध्ये नसलेला 'मॅगसेफ' सपोर्ट आता १७ई मध्ये देण्यात आला आहे, ज्यामुळे वायरलेस चार्जिंग सोपे होणार आहे.
इतर फिचर्स: यामध्ये ॲक्शन बटन, IP68 रेटिंग (पाणी आणि धुळीपासून संरक्षण) आणि ५जी कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे.