International Women's Day 2021: Garmin Lily smartwatch Launched; pregnancy tracking, find out ... | International Women's Day 2021: महिलांसाठी खास Garmin Lily स्मार्टवॉच लाँच; प्रेग्नन्सी ट्रॅकिंगसह खूप सारे फिचर्स, जाणून घ्या...

International Women's Day 2021: महिलांसाठी खास Garmin Lily स्मार्टवॉच लाँच; प्रेग्नन्सी ट्रॅकिंगसह खूप सारे फिचर्स, जाणून घ्या...

स्मार्ट विअरेबल्स आणि जीपीएस ट्रॅकर मेकर कंपनी Garmin ने जागतिक महिला दिनाच्या (International Women's Day 2021) पार्श्वभूमीवर नवीन स्मार्टवॉच Lily भारतात लाँच केले आहे. या घडाळ्याची किंमत 20,990 रुपयांपासून सुरु होत आहे. स्मार्टवॉच Lily हे एकदम एखाद्या ज्वेलरीसारखे दिसते, यामुळे हे घड्याळ महिलांसाठी एकदम फिट आणि सुरक्षेच्या दृष्टीनेदेखील एकदम हिट ठरण्याची शक्यता आहे. या स्मार्टवॉचमध्ये महिलांच्या आरोग्याशी जोडलेले अनेक कमालीचे फिचर्स देण्यात आले आहेत. (Garmin’s Lily Smartwatch Is A Stylish, Health Tracking Watch Designed For Women.)


स्मार्टवॉचमध्ये मेंन्स्ट्रुअल सायकल ट्रॅकिंग फिचरही देण्यात आले आहे. याशिवाय नुकतेच लाँच केलेले प्रेग्नन्सी ट्रॅकिंग फिचरदेखील या स्मार्टवॉचमध्ये देण्यात येणार आहे. हे फिचर गर्भवती महिलांसाठी खूप मदतीचे असणार आहे. या फिचरद्वारे गर्भवती महिलांसाठी हेल्थ स्नॅपशॉट उपलब्ध केला जाणार आहे. यासोबतच आरोग्य कल्याणच्या अन्य सुविधा देखील देण्यात येत आहेत. यामध्ये आरोग्यविषयक निरिक्षणाच्या सुविधा मिळतात. 


Lily स्मार्टवॉचला Gramin कनेक्ट अॅपद्वारे तुमच्या स्मार्टफोनसोबत जोडता येणार आहे. स्मार्टवॉचमध्ये ब्लड ग्लुकोज लेव्हलदेखील तपासता येणार आहे. याचबरोबर कस्टमाईज रिमाईंडर तयार करता येणार आहे. म्हणजेच स्मार्टवॉच आपल्या सुविधेनुसार रिमाईंडर सेट करता येणार आहे. एक्सरसाइज आणि न्यूट्रीशन टिप्स देखील मिळणार आहेत. याशिवाय स्ट्रेस ट्रॅकिंग, बॉडी बॅटरी मॉनिटरिंग फिचर देण्यात आले आहे. यामध्ये अनेक स्पोर्टस अॅक्टिव्हीटीची सुविधा मिळणार आहे. या साऱ्या फिचरमुळे Lily स्मार्टवॉच महिलांसाठी खास बनणार आहे. 

Lily स्मार्टवॉचमध्ये 24mm चा वॉच फेस देण्यात आला आहे. यामध्ये युनिक T-bar lungs आणि 14mm बँड स्लेंडर देण्यात आला आहे. हे स्मार्टवॉच एका युनिक मेटॅलिक पॅटर्न लेंससोबत येते. ज्यामध्ये ब्राइट लिक्विड क्रिस्टल मोनोक्रोमैटिक टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. शिवाय यामध्ये जीपीएस असल्याने तुम्ही कुठे आहात याचे लाईव्ह लोकेशन तुमच्या आप्तेष्ठांनाही पाहता येणार आहे.

Web Title: International Women's Day 2021: Garmin Lily smartwatch Launched; pregnancy tracking, find out ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.