instagram is going to hide like counts in us testing new features for all users | Instagram वर दिसणार नाहीत 'लाईक्स काउंट'; 'हे' आहे कारण
Instagram वर दिसणार नाहीत 'लाईक्स काउंट'; 'हे' आहे कारण

ठळक मुद्देइन्स्टाग्राम लाईक्स लपवण्यासाठी एका नव्या फीचरवर सध्या काम करत आहे. इन्स्टाग्राम हाईड लाईक्स काउंट या फीचरवर काम करत असून पुढील आठवड्यात अमेरिकेत याची चाचणी घेण्यात येणार आहे.इन्स्टाग्रामचे सीईओ एडम मॉसरी यांनी एका कार्यक्रमात याबाबत माहिती दिली.

नवी दिल्ली - सोशल मीडियात फोटोंच्या दुनियेतून वर्चस्व गाजवणाऱ्या इन्स्टाग्रामचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. इन्स्टाग्राम आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स घेऊन येत असतं. इन्स्टावर आपल्या पोस्टना अथवा फोटोला किती लाईक मिळतात हे युजर्सच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असतं. मात्र काही जणांच्या पोस्टला खूपच कमी लाईक्स मिळतात. अशा इन्स्टाग्राम युजर्ससाठी आता एक खूशखबर आहे कारण इन्स्टाग्राम लाईक्स लपवण्यासाठी एका नव्या फीचरवर सध्या काम करत आहे. 

इन्स्टाग्राम हाईड लाईक्स काउंट या फीचरवर काम करत असून पुढील आठवड्यात अमेरिकेत याची चाचणी घेण्यात येणार आहे. इन्स्टाग्रामचे सीईओ एडम मॉसरी यांनी एका कार्यक्रमात याबाबत माहिती दिली आहे. सोशल मीडिया नेटवर्कने याआधी युजर्सवर त्यांच्या पोस्टला किती लाईक्स मिळाले आहेत याचा सतत एक दबाव असतो, तर त्यांच्या पोस्टवर कसे रिअ‍ॅक्शन येतील याच विचारात असतात यासाठीच लाईक काउंट बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे. 

इन्स्टाग्रामने याआधी कॅनडा, इटली, जपान, ब्राझील, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलँडमध्ये लाईक्स काउंट हाईड करण्याचा प्रयोग केला होता. युजर्समध्ये अनेकदा लाईक्सवरून स्पर्धा सुरू असते. ही स्पर्धा कमी करण्यासाठी इन्स्टाग्रामने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. अनेकदा आपल्या प्रतिस्पर्धी युजर्सचे लाईक अधिक असल्यास त्याच्याबाबत द्वेष निर्माण होतो. तर काही जण कमी लाईक्स मिळतील म्हणून पोस्ट न करण्याचा विचार करतात. त्यामुळे या नव्या फीचरचा सर्व युजर्सना फायदा होणार आहे. युजर्स मनात कोणत्याही प्रकारचा संकोच न ठेवता यामुळे बिनधास्त पोस्ट करू शकतात. 

Instagram Will Remove the Following Activity Tab on Instagram | Instagram ने हटवले

Instagram स्टोरीसाठी गाणं वाजणार, नवे 'लिरिकल स्टीकर्स' येणार

इन्स्टाग्राम आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स घेऊन येत असतं. इन्स्टामध्ये असलेलं स्टोरी फीचर अत्यंत लोकप्रिय आहे. यामध्ये सध्या एका नव्या फीचरची चाचणी करण्यात येत आहे. इन्स्टाच्या स्टोरीमध्ये स्टीकर्स अ‍ॅड केल्यानंतर बॅकग्राऊंडला गाणं ऐकू येणार आहे. अ‍ॅपमध्ये लवकरच हे नवं फीचर येण्याची शक्यता आहे. 

Instagram ने हटवले 'हे' लोकप्रिय फीचर

इन्स्टाग्रामवरून Following Tab हटवले आहे. त्यामुळे आता युजर्सना आपल्या मित्र-मैत्रिणींच्या अ‍ॅक्टिव्हीटीवर लक्ष ठेवता येणार नाही. इन्स्टाग्रामचे प्रोडक्ट हेड विशाल शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, इन्स्टाग्रामवरून  Following Tab हटवले आहे. हे युजर्सच्या अत्यंत आवडीचं फीचर होतं. Following Tab च्या मदतीने युजर्सना आपल्या मित्र-मैत्रिणींच्या अ‍ॅक्टिव्हीटीवर लक्ष ठेवता येत होतं. मित्र कोणत्या पोस्ट लाईक्स करतात, फॉलो करतात किंवा कमेंट करतात हे समजण्यास यामुळे मदत होत होती. मात्र हे लोकप्रिय फीचर हटवण्यात आले आहे. Following Tab हे फीचर हटवल्यामुळे अनेक युजर्स नाराज झाले आहेत. 
 

Web Title: instagram is going to hide like counts in us testing new features for all users

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.