आता TV वर पाहता येणार Instagram Reels, कंपनीने लॉन्च केले नवीन App...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 18:16 IST2025-12-17T18:15:45+5:302025-12-17T18:16:55+5:30
Instagram for TV App: या TV अॅपमध्ये एकाच डिव्हाइसवर पाच Instagram अकाउंट्स लॉग-इन करता येतात.

आता TV वर पाहता येणार Instagram Reels, कंपनीने लॉन्च केले नवीन App...
Instagram for TV App: सोशल मीडिया, खासकरुन इंस्टाग्रामचा मोठ्याप्रमाणावर वापर केला जातो. आतापर्यंत मोबाईलवर वापरता येणारे हे अॅप टीव्हीवर पाहता येणार आहे. अॅमेझॉन आणि मेटा यांनी संयुक्तपणे ‘Instagram for TV’ हे नवीन अॅप लॉन्च केले असून, या अॅपच्या मदतीने आता युजर्स थेट टीव्ही स्क्रीनवर Instagram आणि खास करून Reels पाहू शकणार आहेत.
Fire TV वर Instagram Reelsचा अनुभव
‘Instagram for TV’ अॅपमुळे Fire TV डिव्हाइसेसवर Reels पाहणे, लाईक करणे आणि शेअर करणे शक्य झाले आहे. या अॅपमध्ये मोबाइल Instagram प्रमाणेच recommendation algorithm देण्यात आला असून, युजर्सच्या आवडीनुसार कंटेंट सुचवला जातो. हे अॅप Amazon Appstore वरून डाउनलोड करता येते.
अॅमेझॉन-मेटाची भागीदारी
मेटा आणि अॅमेझॉन यांच्या या नव्या भागीदारीचा उद्देश Instagram चे शॉर्ट-फॉर्म कंटेंट, विशेषतः Reels, मोठ्या टीव्ही स्क्रीनवर पोहोचवणे हा आहे. कंपनीच्या माहितीनुसार, युजर्सच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन Reels वेगवेगळ्या channels मध्ये दाखवण्यात येणार आहेत. यासाठी युजर्सना आपल्या Fire TV डिव्हाइसवर Amazon Appstore मधून अॅप इन्स्टॉल करावे लागेल.
मल्टिपल अकाउंट्स आणि स्मार्ट कंटेंट सुचवणार
या TV अॅपमध्ये एकाच डिव्हाइसवर जास्तीत जास्त पाच Instagram अकाउंट्स लॉग-इन करता येतात. त्यामुळे एकाच घरातील अनेक सदस्य वेगवेगळ्या अकाउंट्सने अॅप वापरू शकतात. Instagram च्या proprietary algorithm वर आधारित असल्यामुळे मोबाइल अॅपसारखाच नवीन आणि रिलेव्हंट कंटेंट टीव्हीवरही पाहायला मिळतो. लॉग-इन केल्यानंतर युजर्स आवडते क्रिएटर्स शोधू शकतात तसेच मित्रांची प्रोफाइलही पाहू शकतात.
Reelsवर इंटरेक्शन, सोशल एक्सपीरियंस कायम
‘Instagram for TV’ अॅपद्वारे युजर्स केवळ Reels पाहत नाहीत, तर त्यांना लाईक करणे, कमेंट्स आणि रिअॅक्शन्स वाचणेही शक्य आहे. अॅमेझॉनच्या म्हणण्यानुसार, हा अॅप सोशल इंटरेक्शन लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आला आहे. त्यामुळे Instagram चा एंगेजमेंट मॉडेल टीव्ही प्लॅटफॉर्मवरही सक्रिय राहतो. कुटुंबीय किंवा मित्रांसोबत कंटेंट पाहणाऱ्या युजर्ससाठी हे फीचर विशेष उपयुक्त ठरणार आहे.
कोणत्या Fire TV डिव्हाइसेसवर मिळणार सपोर्ट?
सध्या अमेरिकेत खालील निवडक Amazon Fire TV devices वर ‘Instagram for TV’ अॅप उपलब्ध आहे.
Fire TV Stick HD
Fire TV Stick 4K Plus
Fire TV Stick 4K Max (First & Second Generation)
Fire TV 2-Series
Fire TV 4-Series
Fire TV Omni QLED Series
Instagram for TV अॅपच्या माध्यमातून अॅमेझॉन आणि मेटाने टीव्ही आणि सोशल मीडियामधील अंतर आणखी कमी केले आहे. सध्या हे अॅप अमेरिकेत निवडक Amazon Fire TV devices साठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. येत्या काळात भारतीय युजर्ससाठीही सुरू केले जाईल.