अंतराळात भारताचे पहिले डेटा सेंटर; 2026 मध्ये होणार सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 16:14 IST2026-02-23T16:10:44+5:302026-02-23T16:14:07+5:30

नुकत्याच पार पडलेल्या AI Impact Summit 2026 मध्ये प्रकल्पाचे मॉडेल सादर!

India's first data center in space; to be launched in 2026, know the details... | अंतराळात भारताचे पहिले डेटा सेंटर; 2026 मध्ये होणार सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

अंतराळात भारताचे पहिले डेटा सेंटर; 2026 मध्ये होणार सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

भारत आता अंतराळ आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल टाकण्याच्या तयारीत आहे. भारतीय स्पेस कंपनी Agnikul Cosmos आणि AI क्लाउड कंपनी NeevCloud एकत्र येऊन भारताचे पहिले AI डेटा सेंटर थेट अंतराळात उभारण्याची तयारी करत आहेत. हे डेटा सेंटर पृथ्वीच्या जवळच्या कक्षेत (Low Earth Orbit) स्थापित करण्यात येणार आहे.

कंपन्यांच्या माहितीनुसार, 2026 च्या अखेरीस या स्पेस डेटा सेंटरचा पहिला प्रोटोटाइप टेस्टसाठी पाठवण्यात येणार आहे. चाचणी यशस्वी ठरल्यास, भविष्यात हे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येऊ शकते.

AI Impact Summit मध्ये मॉडेल सादर

AI Impact Summit 2026 मध्ये Agnikul Cosmos आणि NeevCloud यांनी या प्रकल्पाचे मॉडेल सादर केले. आजतकच्या वृत्तानुसार, NeevCloud ने सांगितले की, तयारी जवळपास पूर्ण झाली असून लवकरच प्रोटोटाइप अंतरिक्षात पाठवण्याची प्रक्रिया सुरू होईल.

इलॉन मस्कही स्पेस डेटा सेंटरच्या शर्यतीत

अमेरिकन उद्योगपती इलॉन मस्कदेखील SpaceX मार्फत अंतराळात डेटा सेंटर उभारण्यावर काम करत आहेत. मात्र त्यांचा प्रकल्प सध्या पायलट आणि डेमो टप्प्यात असून, यावर्षी अखेर प्रोटोटाइप पाठवण्याची योजना आहे. अशा परिस्थितीत, भारताचा हा उपक्रम जागतिक स्तरावर विशेष महत्त्वाचा मानला जात आहे.

अंतराळ डेटा सेंटरची काय गरज?

सध्या मोठे डेटा सेंटर जमिनीवर उभारले जातात. त्यासाठी प्रचंड वीज, महागडी कूलिंग सिस्टिम आणि मोठी जागा लागते. यामुळे खर्चही मोठ्या प्रमाणावर वाढतो. अंतराळात डेटा सेंटर उभारल्यास AI प्रोसेसिंग थेट अंतरिक्षात होईल, डेटा अपलोड-डाउनलोडसाठी लागणारा वेळ कमी होईल, सूर्याच्या थेट प्रकाशातून वीज निर्मिती शक्य असेल. शइवाय, नैसर्गिक थंड वातावरणामुळे कूलिंगचा खर्चही कमी येईल. कंपनूचा दावा आहे की, यामुळे AI सेवा अधिक जलद आणि दीर्घकाळात स्वस्त होऊ शकतात.

Agnikul Cosmos आणि NeevCloud काय करते

Agnikul Cosmos

चेन्नईस्थित Agnikul Cosmos ही स्पेस टेक कंपनी असून, लहान आणि किफायतशीर रॉकेट लॉन्चवर कंपनीचा भर आहे.

NeevCloud

NeevCloud ही भारतीय AI आणि क्लाउड कंपनी आहे. AI डेटा प्रोसेसिंग, AI मॉडेल रन करणे आणि क्लाउड-आधारित सोल्युशन्स पुरवते. दोन्ही कंपन्या मिळून AI काम अंतराळातून शक्य आहे का, याची व्यवहार्यता तपासणार आहेत.

2026 अखेर निर्णायक चाचणी

कंपन्यांच्या मते, 2026 च्या अखेरीस पहिली चाचणी होईल. सुरुवातीला मर्यादित वापर आणि नंतर हळूहळू मोठ्या प्रमाणावर विस्तार केला जाईल. तज्ज्ञांचे मत आहे की, हा प्रयोग यशस्वी ठरल्यास AI आणि डेटा प्रोसेसिंगची संपूर्ण कार्यपद्धती बदलू शकते.

भारतासाठी का महत्वाचे?

भारत गेल्या काही वर्षांत अंतराळ आणि AI या दोन्ही क्षेत्रांत वेगाने प्रगती करत आहे. हा प्रकल्प भारताची तांत्रिक क्षमता अधोरेखित करेल, जागतिक पातळीवर भारताची ओळख मजबूत करेल आणि विष्यात अंतराळातून AI सेवा देणाऱ्या मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश होऊ शकतो.

Web Title : अंतरिक्ष में भारत का पहला डेटा सेंटर; 2026 में होगा शुरू, जानिए डिटेल्स

Web Summary : भारत 2026 तक अंतरिक्ष में पहला एआई डेटा सेंटर स्थापित करेगा, जो Agnikul Cosmos और NeevCloud का संयुक्त उद्यम है। इसका उद्देश्य अंतरिक्ष के वातावरण का लाभ उठाकर लागत को कम करना है। भारत, एलन मस्क के स्पेसएक्स सहित एक वैश्विक दौड़ में शामिल हो गया है। यह भारत की बढ़ती अंतरिक्ष और एआई क्षमताओं को उजागर करता है।

Web Title : India's First Space Data Center: Launching in 2026, Details Here

Web Summary : India plans its first space-based AI data center by 2026, a joint venture by Agnikul Cosmos and NeevCloud. This aims to reduce costs by leveraging space's environment. India joins a global race including Elon Musk's SpaceX. It highlights India's growing space and AI capabilities.