सरकारी एजन्सीने जारी केला इशारा, Apple यूजर्सना हॅकर्सचा धोका; कारण काय..?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 04:47 PM2023-10-20T16:47:24+5:302023-10-20T16:47:34+5:30

CERT-In Update: हॅकर्स तुमच्या फोनवर पूर्णपणे नियंत्रण मिळवू शकतात.

indian-government-certin-issue-warning-for-iphone-and-ipad-old-OS | सरकारी एजन्सीने जारी केला इशारा, Apple यूजर्सना हॅकर्सचा धोका; कारण काय..?

सरकारी एजन्सीने जारी केला इशारा, Apple यूजर्सना हॅकर्सचा धोका; कारण काय..?

CERT-In Update: आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात जवळपास प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे. पण, बरेच लोक त्यांचे फोन-टॅबलेट अपडेट करत नाहीत. असे न केल्याने तुमचा डिव्हाइस धोक्यात येऊ शकतो. हॅकर्स अशा डिव्हाइसवर लक्ष ठेवून असतात. दरम्यान, अलीकडेच iOS आणि iPad OS मध्ये दोष आढळून आला आहे. याबाबत CERT-In ने Apple युजर्सना नवीन OS अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे.

हॅकर्स नेहमी संधीच्या शोधात असतात. त्यामुळे तुम्ही जुन्या OS वर काम करत असाल, तर हॅकिंगला बळी पडू शकता. CERT-In (Computer Emergency Response Team) ने अॅपल युजर्ससाठी एक इशारा जारी केली आहे. 14 ऑक्टोबर 2023 रोजी जारी केलेल्या नोट CIVN-2023-0303 मध्ये Apple iOS आणि iPad OS बाबत इशारा देण्यात आला आहे. 

CERT-in म्हणजे काय?
CERT-In ही इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी एजन्सी आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, या सरकारी एजन्सीचे काम सायबर सुरक्षेशी संबंधित बाबी हाताळणे आहे. ही एजन्सी इंटरनेटशी संबंधित सर्व गोष्टींवर नजर ठेवते, ज्याच्या मदतीने लोकांना कोणत्याही धोक्याची वेळीच माहिती दिली जाऊ शकते. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या नोटमध्ये CERT-In ने जुन्या iOS आणि iPad OS बद्दल इशारा जारी केला आहे. 

हॅकर्स लक्ष्य करू शकतात
या जुन्या ओएसमध्ये काही त्रुटी आढळल्या आहेत, ज्यामुळे हॅकर्स तुमच्या डिव्हाइसवर पूर्ण नियंत्रण मिळवू शकतात. तुमच्या iPhone किंवा iPad ची ऑपरेटिंग सिस्टम 16.7.1 पेक्षा पूर्वीची असेल, तर तुम्हाला धोका आहे. हे टाळण्यासाठी तुम्ही तात्काळ डिव्हाइस अपडेट केला पाहिजे. या त्रुटी दूर करण्यासाठी Apple ने आधीच सुरक्षा अपडेट जारी केले आहे. 

अपडेटचे फायदे 
ऑपरेटिंग सिस्टम अपडेट केल्यानंतर, डिव्हाइसमधून फक्त त्रुटी दूर होत नाहीत, तर फोनचा परफॉर्मन्सही चांगला होतो. यासोबतच तुम्हाला नवीन फीचर्सदेखील मिळतील. त्यामुळेच युजरने वेळोवेळी फोन अपडेट केला पाहिजे. फोन अपडेट ऑटो किंवा मॅन्युअल, दोन्ही पद्धतीने केला जातो.

 

Web Title: indian-government-certin-issue-warning-for-iphone-and-ipad-old-OS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.