शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

एअरटेलनंतर आता आयडिया, व्होडाफोनही देणार स्वस्त ४ जी स्मार्टफोन, जिओला टक्कर देण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2017 8:21 AM

आयडिया सेल्युलर आणि व्होडाफोन या कंपन्यांनीही आता आपल्या ग्राहकांना स्वस्तात ४ जी स्मार्टफोन देण्याची योजना आखली आहे. त्यांच्या फोनची प्रभावी किंमतही १,५00 रुपयांच्या आसपास राहणार आहे.

ठळक मुद्देआयडिया सेल्युलर आणि व्होडाफोन या कंपन्यांची ग्राहकांना स्वस्तात ४ जी स्मार्टफोन देण्याची योजनाफोनची प्रभावी किंमत १,५00 रुपयांच्या आसपास आयडिया आणि व्होडाफोन या कंपन्या महाविलीनीकरणाच्या प्रक्रियेतही आहेत

मुंबई - आयडिया सेल्युलर आणि व्होडाफोन या कंपन्यांनीही आता आपल्या ग्राहकांना स्वस्तात ४ जी स्मार्टफोन देण्याची योजना आखली आहे. त्यांच्या फोनची प्रभावी किंमतही १,५00 रुपयांच्या आसपास राहणार आहे.

रिलायन्स जिओने पहिल्यांदा स्वस्त फोन देण्याची योजना जाहीर केली होती. त्यानंतर भारतीय एअरटेलनेही अशीच घोषणा केली. जिओच्या फोनची प्रभावी किंमत १,५00 रुपये, तर एअरटेलच्या फोनची प्रभावी किंमत १,३९९ रुपये आहे. आता व्होडाफोन आणि आयडिया या स्पर्धेत उतरल्या आहेत. या कंपन्या लावा आणि कार्बन या हँडसेट उत्पादक कंपन्यांशी चर्चा करीत आहेत. विशेष म्हणजे आयडिया आणि व्होडाफोन या कंपन्या महाविलीनीकरणाच्या प्रक्रियेतही आहेत. या वृत्तास लावा आणि कार्बन या कंपन्यांच्या सूत्रांकडून दुजोरा मिळाला आहे. लावाचे उत्पादन प्रमुख गौरव निगम यांनी सांगितले की, आम्ही तीनही कंपन्यांशी चर्चा करीत आहोत. अजून अंतिम निर्णय झालेला नाही.

नोकिया आणणार स्वस्त फोर-जी फिचर फोननोकिया ब्रँडची मालकी असणार्‍या एचएमडी ग्लोबल कंपनीने नोकियाचे जोरदार रिलाँचिंग केले आहे. याच्या अंतर्गत नोकिया ८ या फ्लॅगशीप स्मार्टफोनसह अन्य काही किफायतशीर मॉडेल्सदेखील सादर करण्यात आले आहेत. या पार्श्‍वभूमीवर कधी काळी प्रचंड गाजलेल्या नोकिया ३३१० या मॉडेलची थ्री-जी आवृत्ती भारतीय ग्राहकांना सादर करण्यात येईल असे वृत्त मध्यंतरी आले होते. तथापि, भारतातील फोर-जी नेटवर्कचा वाढता आलेख पाहता नोकिया कंपनी याऐवजी अत्यंत स्वस्त मूल्यात फोर-जी नेटवर्क कनेक्टिव्हिटी असणारा फिचर फोन सादर करण्याची माहिती समोर आली आहे. एचएमडी ग्लोबल कंपनीच्या भारतीय विभागाचे उपाध्यक्ष अजय मेहता यांनी इकॉनॉमिक टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. जिओफोनला मिळालेल्या प्रतिसादानंतर आपली कंपनी भारतात अत्यंत किफायतशीर मूल्यात फोर-जी फिचरफोन लाँच करण्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला. यात जिओफोनप्रमाणे फोर-जी आणि फोर-जी व्हिओएलटीई नेटवर्कचा सपोर्ट असेल. 

BSNL आणणार स्वस्त स्मार्टफोनबीएसएनएलने लाव्हा आणि मायक्रोमॅक्स या स्मार्टफोन मेकर कंपन्यांशी हातमिळवणी केली आहे. बीएसएनएल आपल्या ग्राहकांसाठी 2 हजार 500 रुपयांहून कमी किंमतीचा स्मार्टफोन वेगवेगळ्या ऑफर्ससोबत मार्केटमध्ये घेऊन येणार असल्याचे समजते. बीएसएनएलचे अधिकारी के. रामाचंद यांच्या माहितीनुसार, स्वस्त दरात स्मार्टफोन उपलब्ध करुन देण्यासाठी बीएसएनएलने मायक्रोमॅक्स आणि लाव्हा कंपनीसोबत भागिदारी केली आहे. मात्र या स्मार्टफोनची नक्की किंमत किती असेल, याबाबत सध्या विचार सुरु आहे.

सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजेच सीओएआयच्या रिपोर्टनंतर बीएसएनएलने स्मार्टफोनबाबतची घोषणा केली. या रिपोर्टनुसार, 16 टक्क्यांपर्यंत इंटरनेट ग्रामीण भागात वापरला जातो. ग्रामीण भागात बीएसएनएलचे ग्राहक चांगल्या प्रमाणात असल्याने बीएसएनएलने स्मार्टफोनबाबतही विचार सुरु केला आहे.

टॅग्स :JioजिओReliance Jioरिलायन्स जिओMobileमोबाइल