रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी BSNL आणणार स्वस्त स्मार्टफोन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2017 08:49 PM2017-10-06T20:49:48+5:302017-10-06T20:54:06+5:30

रिलायन्स जिओच्या फोनला टक्कर देण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) लवकरच आपल्या ग्राहकांसाठी स्वस्त आणि मस्त असा स्मार्टफोन घेऊन येणार आहे.

Cheap smartphone to bring BSNL to RIL | रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी BSNL आणणार स्वस्त स्मार्टफोन

रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी BSNL आणणार स्वस्त स्मार्टफोन

Next
ठळक मुद्देस्वस्त आणि मस्त असा स्मार्टफोन 2 हजार 500 रुपयांहून कमी किंमतीचा दिवाळीमध्ये मार्केटमध्ये येणार असल्याची चर्चा

मुंबई : रिलायन्स जिओच्या फोनला टक्कर देण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) लवकरच आपल्या ग्राहकांसाठी स्वस्त आणि मस्त असा स्मार्टफोन घेऊन येणार आहे.  यासाठी बीएसएनएलने लाव्हा आणि मायक्रोमॅक्स या स्मार्टफोन मेकर कंपन्यांशी हातमिळवणी केली आहे.
रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल, व्होडाफोन आणि आयडियाने 4 जी फिचर फोन मार्केटमध्ये आणण्याची घोषणा केली आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणताही प्रत्यक्षात निर्णय या कंपन्याकडून घेण्यात आला नसल्याचे समजते. मात्र, यामध्ये आता बीएसएनएलने उडी घेतली असून आपल्या ग्राहकांसाठी 2 हजार 500 रुपयांहून कमी किंमतीचा स्मार्टफोन वेगवेगळ्या ऑफर्ससोबत मार्केटमध्ये घेऊन येणार असल्याचे समजते. 
बीएसएनएलचे अधिकारी के. रामाचंद यांच्या माहितीनुसार, स्वस्त दरात स्मार्टफोन उपलब्ध करुन देण्यासाठी बीएसएनएलने मायक्रोमॅक्स आणि लाव्हा कंपनीसोबत भागिदारी केली आहे. मात्र या स्मार्टफोनची नक्की किंमत किती असेल, याबाबत सध्या विचार सुरु आहे.
सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजेच सीओएआयच्या रिपोर्टनंतर बीएसएनएलने स्मार्टफोनबाबतची घोषणा केली. या रिपोर्टनुसार, 16 टक्क्यांपर्यंत इंटरनेट ग्रामीण भागात वापरला जातो. ग्रामीण भागात बीएसएनएलचे ग्राहक चांगल्या प्रमाणात असल्याने बीएसएनएलने स्मार्टफोनबाबतही विचार सुरु केला आहे.

एअरटेल आणणार 2500 रुपयांत स्मार्टफोन...
रिलायन्स जिओने 4 जी फीचर फोन लॉंच केल्यानंतर एअरटेलने 2500 रुपयांत स्मार्टफोन आणणार असल्याची घोषणा केली आहे. एअरटेलचा हा स्मार्टफोन येत्या दिवाळीमध्ये मार्केटमध्ये येणार असल्याची चर्चा सुरु आहे. याचबरोबर, या स्मार्टफोनसह अनेक ऑफर्स देण्यात येणार आहेत. यामध्ये डाटा आणि कॉलिंग संदर्भात असणार आहेत. 
 

Web Title: Cheap smartphone to bring BSNL to RIL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mobileमोबाइल