'ईसीजी' काढणारे स्मार्ट वॉच आले! भारतात 'या' किंमतीला कंपनी लाँच करून बसली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 17:22 IST2025-11-25T17:21:29+5:302025-11-25T17:22:04+5:30
Huawei Watch GT 6 Pro भारतात लाँच! ECG सेन्सर, टायटॅनियम केस आणि २१ दिवसांपर्यंत बॅटरी लाईफ.

'ईसीजी' काढणारे स्मार्ट वॉच आले! भारतात 'या' किंमतीला कंपनी लाँच करून बसली...
चीनी तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी हुवावे ने भारतीय बाजारपेठेत आपली बहुप्रतिक्षित Huawei Watch GT 6 आणि Huawei Watch GT 6 Pro स्मार्टवॉच सीरिज लाँच केली आहे. विशेषतः प्रो मॉडेलमध्ये असणाऱ्या हायटेक आरोग्य वैशिष्ट्यांमुळे ही वॉच अधिक चर्चेत आहे.
Huawei Watch GT 6 Pro ची सर्वात मोठी खासियत म्हणजे यात असलेले ईसीजी आणि डेप्थ सेन्सर फीचर्स आहे. यामुळे ही स्मार्टवॉच हृदयाचे आरोग्य आणि पाण्यातील क्रियाकलाप (जसे की जलतरण) अधिक अचूकपणे मॉनिटर करू शकते.
हुवावेने वॉच जीटी ६ प्रो व्यतिरिक्त वॉच जीटी ६चे स्टँडर्ड व्हर्जन देखील लाँच केले आहे. ज्याची किंमत ₹२१,९९९ पासून सुरू होते. स्टँडर्ड व्हर्जनमध्ये ईसीजी आणि डेप्थ सेन्सर हे फीचर्स उपलब्ध नाहीत. ही स्मार्टवॉच अँड्रॉइड ९ वरील आणि iOS १३ च्यावरील व्हर्जन असलेल्या स्मार्टफोनना कनेक्ट करता येणार आहे.
| वैशिष्ट्य | Watch GT 6 Pro |
| प्रारंभिक किंमत | ₹२८,९९९ (ब्लॅक आणि ब्राउन कलर पर्याय) |
| टायटॅनियम मॉडेल किंमत | ₹३९,९९९ |
| जास्तीत जास्त बॅटरी लाईफ | २१ दिवसांपर्यंत (सामान्य वापरात १२ दिवस) |
| डिस्प्ले | १.४७-इंच AMOLED डिस्प्ले |
| केस मटेरियल | टायटॅनियम अलॉय केस |
| आरोग्य फीचर्स | ECG सेन्सर, ऑप्टिकल हार्ट रेट सेन्सर, बॉडी टेम्परेचर सेन्सर, डेप्थ सेन्सर (पाण्यातील खोली मोजण्यासाठी) |
| रेझिस्टन्स | 5ATM + IP69 (पाणी आणि धूळ प्रतिरोधक) |
| कनेक्टिव्हिटी | सनफ्लावर जीपीएस, NFC, ब्लूटूथ 6, वाय-फाय, NavIC सपोर्ट |