शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

शक्तिशाली स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसरसह Huawei P50 लाँच; 50MP कॅमेरा आणि 66W चार्जिंगची जोड 

By सिद्धेश जाधव | Published: July 30, 2021 11:34 AM

Huawei P50 Launch: Huawei P50 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. हा फोन हुवावे फोन 66वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 4,100एमएएचची बॅटरीला सपोर्ट करतो. 

Huawei ने शक्तिप्रदर्शन करत दमदार ‘पी50 सीरीज‘ चीनमध्ये सादर केली आहे. या सीरिजमध्ये कंपनीने Huawei P50 आणि Huawei P50 Pro असे दोन फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच केले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन फ्लॅगशिप प्रोसेसर, फास्ट चार्जिंग आणि शानदार कॅमेरा सेटअपसह सादर करण्यात आले आहेत. या लेखात आपण हुवावे वी50 स्मार्टफोनची माहिती घेणार आहोत.  (Huawei P50 and P50 Pro officially announced)

Huawei P50 चे स्पेसिफिकेशन्स 

हुवावे पी50 मध्ये 6.5 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले 1224 x 2700 पिक्सल रिजोल्यूशन आणि 90हर्ट्ज रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. हा ओएलईडी पॅनल 300हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. Huawei P50 मध्ये कंपनीने HarmonyOS 2 दिला आहे. हा फोन क्वॉलकॉमच्या शक्तिशाली स्नॅपड्रॅगन 888 चिपसेटवर चालतो. फोनमध्ये 8 जीबी रॅमपर्यंत रॅम आणि 256 जीबी पर्यंतची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. ही स्टोरेज नॅनो मेमरी कार्डने 256 जीबी पर्यंत वाढवता येते.  

Huawei P50 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. यात फ्लॅश लाईटसह 50 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 13 मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर आणि ओआयएससह 12 मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. पावर बॅकअपसाठी हा फोन हुवावे फोन 66वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 4,100एमएएचची बॅटरीला सपोर्ट करतो.   

Huawei P50 ची किंमत 

हुवावे पी50 चीनीमध्ये दोन व्हेरिएंटमध्ये लाँच केला गेला आहे. या फोनच्या 8GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत CNY 4,488 (अंदाजे 51,600 रुपये) आहे. तसेच 8GB रॅम + 256GB स्टोरेज व्हेरिएंट CNY 4,988 (अंदाजे 57,300 रुपये) मध्ये विकत घेता येईल.  

टॅग्स :huaweiहुआवेSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानchinaचीन