शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

सावधान! ATM मशिनजवळ केलेल्या 'या' एका चुकीमुळे व्हाल कंगाल; 'असा' करा बचाव अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2024 12:38 PM

महिला एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेली होती, मात्र तिचे कार्ड एटीएममध्ये अडकले. त्या एटीएममध्ये एकही गार्ड नव्हता.

लोकांना आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी स्कॅमर्स वेगवेगळ्या प्रकारच्या युक्त्या वापरतात. असंच काहीसं नुकतंच एका महिलेसोबत घडलं, जी स्कॅमर्सच्या एटीएम स्कॅममध्ये अडकली होती. महिला दिल्लीतील मयूर विहार भागातील रहिवासी आहे. ती एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेली होती. यावेळी तिचे कार्ड एटीएममध्ये अडकले. यानंतर पीडितेने हेल्पलाइन क्रमांकावर कॉल केला असता तिची फसवणूक झाली. स्कॅमर्सने तिच्या 21 हजारांवर डल्ला मारला आहे. हे संपूर्ण प्रकरण काय आहे हे जाणून घेऊया.

या महिन्याच्या सुरुवातीला ही घटना घडली होती. महिला एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेली होती, मात्र तिचे कार्ड एटीएममध्ये अडकले. त्या एटीएममध्ये एकही गार्ड नव्हता. त्यानंतर तिने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर दिलेल्या माहितीत सांगितलं की, तिला एटीएमच्या भिंतीवर एक नंबर सापडला.

एटीएमबाहेर उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने हा एजंटचा कॉन्टॅक्ट नंबर असल्याचं सांगितलं. यानंतर, महिलेने तो नंबर डायल केला, त्यानंतर बनावट एजंटने तिला रिमोटली एटीएम बंद करण्याचा सल्ला दिला, जेणेकरून ती तिचं कार्ड बाहेर काढू शकेल. यासाठी स्कॅमरने तिला काही स्टेप्स फॉलो करण्यास सांगितलं.

बनावट एजंटने दिलेल्या स्टेप्स फॉलो करूनही तिचं एटीएम कार्ड बाहेर आलं नाही. एजंटने तिला आश्वासन दिलं की दुसऱ्या दिवशी इंजिनिअर्स एटीएममधून तिचे कार्ड काढून तिला परत करतील. यानंतर महिलेच्या बँक खात्यातून पैसे काढण्यात आल्याचं आढळून आले आणि एटीएममध्ये तिचं कार्डही नव्हतं. महिलेने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तक्रार नोंदवून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. 

'या' गोष्टी ठेवा लक्षात

- भिंतीवर लिहिलेल्या फोन नंबरवर कधीही विश्वास ठेवू नये. - एटीएम मशिनमध्ये तुमचं कार्ड अडकलं तर तुम्ही थेट तुमच्या बँकेशी संपर्क साधावा. -ंयासाठी तुम्ही बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरून नंबर मिळवू शकता.- तुमचा एटीएम कार्ड पिन कोणाशीही शेअर करू नका.- जर कोणी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो करण्यास सांगत असेल तर विचार न करता त्यांचे अनुसरण करू नका. - तुमची कोणत्याही प्रकारची फसवणूक झाल्यास, त्याबद्दल ताबडतोब तुमच्या बँकेला कळवा.- एटीएम फसवणुकीविरोधात पोलिसात तक्रार करा. 

टॅग्स :atmएटीएमMONEYपैसा