गुगलचं व्हेलेंटाइन्स स्पेशल डूडल, प्रेमाचं प्रतिक साकारून दिल्या शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2018 10:36 IST2018-02-14T10:32:07+5:302018-02-14T10:36:08+5:30
आजचा दिवस साजरा करण्यासाठी सगळेच जण जोरदार तयारी करत आहेत.

गुगलचं व्हेलेंटाइन्स स्पेशल डूडल, प्रेमाचं प्रतिक साकारून दिल्या शुभेच्छा
मुंबई- व्हेलेंटाईन्स डे म्हणजेच प्रेमाचा दिवस. आजचा दिवस साजरा करण्यासाठी सगळेच जण जोरदार तयारी करत आहेत. आजच्या दिवशी तरुणाई आपलं प्रेम व्यक्त करत असते. गुगलही या प्रेमाच्या उत्सवात मागे राहिल नाही. गुगलने डूडलच्या माध्यमातून प्रेमाच्या या दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
आज व्हॅलेंटाईन डे आणि त्यात सध्या विंटर ऑलंपिक सुरू आहे. या दोघांना एकत्र करून गुगल आजचं डूडल तयार केलं आहे. बाहेरची गुलाबी थंडी आणि त्यात प्रेमाचा वर्षाव...तसंच गुगलनंही केलं आहे. एक छान म्यूझिक आणि त्यात दोन पक्षांचा एकत्रित डान्स असा एक व्हिडिओ तयार करून गुगलनं सर्वांना व्हेलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या जोडीदाराला स्पेशल वाटावं यासाठी काय काय करायला हवं? याबद्दलची खास तयारी सुरू आहे. विविध प्लॅनिंग्स करून सगळेच जण आजचा दिवस खास करण्याचा प्रयत्न करतात. आजच्या दिवशी प्रेमाच्या त्या सर्व रोमँटीक गाण्यांना आणि प्रेमाच्या कवितांना उधाण येतं. त्यामुळे आपल्या जोडीदाराला खूश करण्यासाठी काय वेगळं करता येईल, याचंही खास प्लॅनिंग केलं असतं.