शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

भारीच! गुगलचं नवं फीचर येणार, शब्दांचे उच्चार शिकवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2019 11:18 IST

गुगल प्रश्नांची उत्तरं शोधण्यासोबतच बोलायला देखील शिकवणार आहे.

ठळक मुद्देगुगल प्रश्नांची उत्तरं शोधण्यासोबतच बोलायला देखील शिकवणार आहे. फीचरच्या मदतीने युजर्सना शब्दांचे उच्चार (Pronunciation) चेक करता येणार आहे. गुगल युजर्सना योग्य उच्चार शिकवणार आहे. 

नवी दिल्ली - गुगल लोकप्रिय सर्च इंजिन असल्याने अनेक गोष्टी गुगलवर सर्च केल्या जातात. मात्र आता गुगल प्रश्नांची उत्तरं शोधण्यासोबतच बोलायला देखील शिकवणार आहे. गुगलने आपल्या गुगल सर्चसाठी एक नवीन फीचर आणले आहे. या फीचरच्या मदतीने युजर्सना शब्दांचे उच्चार (Pronunciation) चेक करता येणार आहे. याआधी गुगलवर एखादा शब्द सर्च केल्यानंतर त्याचा उच्चार युजर्स ऐकू शकत होते. मात्र आता या नव्या फीचरच्या मदतीने गुगल युजर्सना योग्य उच्चार शिकवणार आहे. 

गुगलने या फीचरसाठी मशीन लर्निंगचा वापर केला आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजेन्सच्या मदतीने कोणत्या शब्दाचा उच्चार कसा केला जातो हे पाहिलं जाईल. त्यानंतर गुगलचं स्पीच रिकॉग्निशन टूल बोलण्यात आलेल्या शब्दावर प्रोसेस करेल. तसेच ते एक्स्पर्टच्या उच्चारासोबत मॅच करेल. ज्या शब्दाचा उच्चार करणं अवघड आहे असा शब्द गुगलवर सर्च करा. तिथे स्पीक नाऊ हा ऑप्शन देण्यात येईल. माईक आयकॉनवर टॅप करून तो शब्द युजर्सना बोलता येईल. 

युजरने शब्द उच्चारल्यानंतर त्याचा उच्चार योग्य आहे की नाही याची माहिती फीचरच्या मदतीने मिळेल. बोलताना नेमकी काय चूक झाली आहे आणि योग्य उच्चार नेमका काय आहे याबाबत काही सजेशन देण्यात येतील. सध्या या फीचरमध्ये ही सुविधा केवळ इंग्रजी भाषेत देण्यात आली आहे. मात्र कंपनीने इतरही भाषेत लवकरच हे उपलब्ध होईल अशी माहिती दिली आहे. सध्या या नव्या फीचरची चाचणी सुरू असल्याची माहिती गुगलने दिली आहे. तसेच हे फीचर मोबाईलसाठी उपलब्ध असून लवकरच त्यात आणखी काही पर्याय देण्यात येणार आहेत. 

हॅकिंगच्या प्रमाणात वाढ झाली आहे. हॅकर्स अत्यंत शिताफीने युजर्सचा डेटा चोरत आहेत. यामुळे युजर्सच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र आता हॅकिंगपासून वाचण्यासाठी गुगलनेच एक नवा सल्ला दिला आहे. स्मार्टफोन आणि लॅपटॉपवर गुगल क्रोमचा वापर केला जातो. त्यामुळे गुगलने आता सर्व क्रोम युजर्सना आपलं ब्राऊजर अपडेट करायला सांगितलं आहे. तसेच युजर्स क्रोमच्या लेटेस्ट व्हर्जनचा वापर करतील. 

गुगलने दिलेल्या माहितीनुसार, क्रोमसाठी एक फिक्स रोलआऊट केलं आहे. ज्याच्या मदतीने युजर्स हॅकिंगपासून वाचू शकतात. ब्राऊजर अपडेट न केल्यास हॅकर्स युजर्सचं डिव्हाईस हॅक करू शकतात. गुगल क्रोमच्या या अपडेटच्या माध्यमातून जीरो डे वल्नरबिलिटी ठिक केली असल्याची माहिती डिजिटल ट्रेंड्सने दिली आहे. जुने व्हर्जन असलेल्या क्रोम बाऊजरवर हॅकिंगचं सावट आहे.  

 

टॅग्स :googleगुगलMobileमोबाइलSocial Mediaसोशल मीडिया