शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

Google चा स्वस्त आणि मस्त Pixel 5a होणार लाँच; तारीख आणि किंमत झाली लिक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2021 1:35 PM

Google Pixel Smartphone : दिग्गज टेक्नॉलॉजी कंपनी आपला स्मार्टफोन Pixel 5a आणण्याच्या तयारीत आहे. लाँच पूर्वीच किंमत झाली लिक.

ठळक मुद्दे दिग्गज टेक्नॉलॉजी कंपनी आपला स्मार्टफोन Pixel 5a आणण्याच्या तयारीत आहे.लाँच पूर्वीच किंमत झाली लिक.

दिग्गज टेक्नॉलॉजी कंपनी गुगल आपला Pixel 5a हा स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीकडून लाँच केला जाणारा हा स्मार्टफोन परवडणाऱ्या दरातील असणार असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, काही ठिकाणी या स्मार्टफोनचं लाँच टाळण्यात आल्याचं म्हटलं होतं. परंतु हा स्मार्टफोन याच महिन्यात किंवा आगामी महिन्यात लाँच केला जाण्याची शक्यता एका रिपोर्टमधून वर्तवण्यात आली आहे. लाँच डेट व्यतिरिक्त या स्मार्टफोनची किंमतही लिक झाली आहे. 

इंग्रजी वेबसाईट FrontPageTech च्या रिपोर्टनुसार गुगल नवा Pixel 5a हा स्मार्टफोन येत्या २६ ऑगस्ट रोजी लाँच करणार आहे. या वेबसाईटनं सूत्रांच्या हवाल्यानं या तारखेचा खुलासा केला आहे. तसंच या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 765G प्रोसेसर, 6GB रॅम आणि 4650mAh ची बॅटरी देण्यात येणार आहे. 

अन्य फीचर्सबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये 6.34 इंचाचा स्क्रीन देण्यात आला आहे. तसंच हा 90Hz रिफ्रेश रेटसह येतो. यामध्ये 2020 मध्ये आलेल्या Pixel 5 प्रमाणेच कॅमेरा आणि एक हेडफोन जॅक मिळण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनमध्ये IP67 रेटिंगही मिळू शकतं. परंतु यामध्ये वायरलेस चार्जिंग नसेल असं म्हटलं जात आहे. 

किती असेल किंमत?जे लोक  Pixel 5a च्या भारतात लाँच होण्याची वाट पाहत होते, त्यांच्या पदरी मात्र निराशा येण्याची शक्यता आहे. हा स्मार्टफोन सध्या केवळ अमेरिका आणि जपानमध्ये लाँच केला जाणार असल्याचं गुगलनं स्पष्ट केलं होतं. या स्मार्टफोनची किंमत 450 डॉलर्स म्हणजेच जवळपास 33,900 रूपये असण्याची शक्यता आहे. तसंच हा स्मार्टफोन ऑनलाईन किंवा फिजिकल रिटेल स्टोरद्वारे विक्रीसाठी उपलब्ध केला जाऊ शकतो.

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनgoogleगुगलAmericaअमेरिकाJapanजपानIndiaभारत