रशियाची Google कडूनही कोंडी! सरकारी माध्यमांचे चॅनल्स केले ब्लॉक, Youtubeचीही कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 16:06 IST2022-03-01T16:04:51+5:302022-03-01T16:06:23+5:30
युक्रेन विरोधात युद्ध पुकाराल्यामुळे रशियाची नाटो आणि युनायडेट युनियन्सकडून आर्थिक कोंडी केली जात आहे. तसंच आता इतर माध्यमातूनही रशियाला धक्का देण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे.

रशियाची Google कडूनही कोंडी! सरकारी माध्यमांचे चॅनल्स केले ब्लॉक, Youtubeचीही कारवाई
युक्रेन विरोधात युद्ध पुकाराल्यामुळे रशियाची नाटो आणि युनायडेट युनियन्सकडून आर्थिक कोंडी केली जात आहे. तसंच आता इतर माध्यमातूनही रशियाला धक्का देण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. गुगलनं रशियाच्या RT आणि Sputnik या सरकारी माध्यमांचे यूट्यूब चॅनल्स ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी यूट्यूबनं या दोन्ही चॅनल्सला जाहिरातीच्या माध्यमातून मिळणाऱ्या कमाईवर बंदी घातली होती. आता थेट चॅनल ब्लॉक करण्यात आल्याची माहिती खुद्द सरकारी माध्यम असलेल्या RT नं दिली आहे.
⚡️⚡️ Google has announced it is blocking RT and Sputnik YouTube channels pic.twitter.com/IDs7FtBnKv
— RT (@RT_com) March 1, 2022
YouTube वर दोन्ही चॅनल्स झाले ब्लॉक
फेसबुकची मालकी असलेल्या मेटा कंपनीनंही RT आणि Sputnik चे पेजेस ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला होता. मेटा कंपनीचे जागतिक घडामोडींचे प्रमुख Nick Clegg यांनी ट्विटरवर याबाबतची माहिती दिली होती. युरोपीय देशांच्या आग्रहानंतर रशियाच्या सरकारी माध्यमांना ब्लॉक करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलं आहे.
ट्विटरनंही रिच केला कमी
YouTube नं RT आणि Sputnik या दोन्ही चॅनल्सला युरोपातच बंदी घातली गेली आहे. आमची टीम संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून असल्याचं यूट्यूबच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे. यूट्यूब आणि फेसबुकसोबतच ट्विटरनंही रशियन माध्यमांविरोधात कठोर पाऊल उचललं आहे. रशियाच्या सरकारी माध्यमांच्या ट्विट्सचा रिच कमी केल्याचं ट्विटरच्यावतीनं सांगण्यात आलं आहे.