२०२५ सरता सरता...! Google वर '67' सर्च करताच तुमची स्क्रीन थरथरू लागतेय? तुम्हीही करून पहा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 12:18 IST2025-12-30T12:15:10+5:302025-12-30T12:18:53+5:30
Google Search 67 Trick: सध्या गुगलवर '67' सर्च करण्याचा ट्रेंड व्हायरल झाला आहे. यामुळे स्क्रीन का थरथरते आणि यामागील गुगलचं इस्टर एग काय आहे? वाचा सविस्तर.

२०२५ सरता सरता...! Google वर '67' सर्च करताच तुमची स्क्रीन थरथरू लागतेय? तुम्हीही करून पहा...
सध्या सोशल मीडियावर एक विचित्र आणि मजेशीर ट्रेंड तुफान व्हायरल होत आहे. जर तुम्ही गुगल सर्च इंजिनवर जाऊन '67' हा आकडा टाईप केला, तर तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपची स्क्रीन चक्क थरथरू लागते. सुरुवातीला अनेकांना वाटलं की हा त्यांच्या डिव्हाइसमधील एखादा तांत्रिक बिघाड आहे, पण प्रत्यक्षात हे गुगलचं एक नवीन गुपित म्हणजेच 'इस्टर एग' आहे.
जेव्हा युजर्स गुगल सर्च बारमध्ये '67' लिहितायत, तेव्हा काही सेकंदांसाठी सर्च रिझल्ट्सची स्क्रीन डाव्या-उजव्या बाजूला वेगाने हलते. हा प्रकार इतका अनपेक्षित आहे की युजर्सना याचे खूप कुतूहल वाटत आहे. इंस्टाग्राम, एक्स (ट्विटर) आणि फेसबुकवर युजर्स याचे व्हिडिओ शेअर करून इतरांनाही हे करून बघण्याचे आवाहन करत आहेत.
गुगल असं का करतंय?
गुगल अनेकदा अशा प्रकारच्या मजेशीर ट्रिक्स आपल्या सर्च इंजिनमध्ये लपवून ठेवतं, ज्याला टेक भाषेत 'इस्टर एग' म्हणतात. याआधी 'Do a barrel roll' (स्क्रीन ३६० अंशात फिरणे) किंवा 'Askew' (स्क्रीन तिरकी होणे) या ट्रिक्स खूप लोकप्रिय झाल्या होत्या. २०२५ च्या सुरुवातीला गुगलने '67' या आकड्यासोबत हा नवीन प्रयोग केला आहे.
तुम्हाला हा अनुभव घ्यायचा असेल तर इथे क्लिक करा... हीच लिंक कॉपी करा आणि मित्रमैत्रिणींना पाठवा...
कसं तपासायचं?:
१. तुमच्या फोन किंवा कॉम्प्युटरवर https://www.google.com/ उघडा.
२. सर्च बारमध्ये फक्त 67 टाईप करा (सर्च बटण दाबण्याचीही गरज नाही). एन्टर बटन दाबा.
३. तुम्हाला तुमची स्क्रीन काही क्षणांसाठी थरथरताना दिसेल.